दाेन मुलांचा नदीत बुडून मृत्यू: कन्हान परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 09:03 PM2021-05-07T21:03:04+5:302021-05-07T21:06:14+5:30

drowning death कन्हान नदीच्या पात्रात पाेहत असताना मित्र बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा सरसावला असता, ताेही बुडाला. यात दाेघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान परिसरात शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

Two children drown in river: Incident in Kanhan area | दाेन मुलांचा नदीत बुडून मृत्यू: कन्हान परिसरातील घटना

दाेन मुलांचा नदीत बुडून मृत्यू: कन्हान परिसरातील घटना

Next
ठळक मुद्दे पाेहण्याचा माेह अंगलट

लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : कन्हान नदीच्या पात्रात पाेहत असताना मित्र बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा सरसावला असता, ताेही बुडाला. यात दाेघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान परिसरात शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

रोहन रणजित भिसे (१३) व हसीन नंदकिशोर पुरवले (१५, दोघेही रा. एम.जी. नगर, वाघधरे वाडी, कन्हान, ता. पारशिवनी) अशी मृतांची नावे आहेत. दाेघेही त्यांच्या काही मित्रांसाेबत कन्हान नदीत पाेहायला गेले हाेते. त्यांनी नदीच्या तीरावर पाेहायला सुरुवात केली. पाण्याचा अंदाज न आल्याने राेहन गटांगळ्या खाऊ लागला. त्याने मदत मागताच हसीन त्याला वाचवण्यासाठी सरसावला. हसीनने राेहनला पकडण्याचा प्रयत्न करताच दाेघेही प्रवाहात आले आणि बुडायला लागले.
ते प्रवाहात दिसेनासे झाल्याचे पाहून इतर मित्रांनी लगेच गाव गाठले आणि त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांना माहिती दिली. शिवाय, दाेघांच्याही पालकांनी पाेलिसांना सूचना दिली. प्रभारी ठाणेदार सुजितकुमार सिरसागर, जावेद शेख, शरद गीते, संजय भदोरिया, वीरेंद्र चौधरी यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिक पाेहणाऱ्यांच्या मदतीने दाेघांचाही पाण्यात शाेध घ्यायला सुरुवात केली. एक तासाच्या प्रयत्नानंतर दाेघांचेही मृतदेह शाेधून काढण्यात त्यांना यश आले. दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Two children drown in river: Incident in Kanhan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.