आज रंगणार महामॅरेथॉनचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:10 AM2020-02-02T00:10:37+5:302020-02-02T00:12:35+5:30

बहुप्रतिक्षित प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रविवारी (दि. २ फेब्रुवारी) रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे. या आयोजनात हजारो धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर व राज्यातील धावपटू सहभागी होणार आहेत.

The thrill of the marathon going on today | आज रंगणार महामॅरेथॉनचा थरार

आज रंगणार महामॅरेथॉनचा थरार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुप्रतिक्षित प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रविवारी (दि. २ फेब्रुवारी) रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे. या आयोजनात हजारो धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर व राज्यातील धावपटू सहभागी होणार आहेत. नागपूर महामेट्रो हे सहप्रायोजक आहेत.
ही महामॅरेथॉन ५ कि.मी. अंतराची ‘फन रन’(वय वर्ष १२ पेक्षा अधिक आणि छंद जोपासणाऱ्यांसाठी), १० कि. मी. पॉवर रन (वय वर्ष १६ पेक्षा अधिक) आणि २१ कि.मी. (वय वर्ष १८ पेक्षा अधिक) असणार आहे. याशिवाय ३ कि.मी. अंतराची फॅमिली रन राहील. ती सर्वांसाठी खुली असेल.
मॅरेथॉन शर्यतींना सुरुवात होण्याआधी विद्यापीठ क्रीडांगणावर रिलॅक्स झिलतर्फे सहभागी धावपटंूसाठी वॉर्मअप म्हणून ‘झुंबा’ होणार आहे. याशिवाय मनोरंजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व शर्यती आटोपताच त्याच ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल. दरम्यान सर्व सहभागी धावपटूंसाठी आयोजकांतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
बाहेर पडा, धावपटूंना प्रोत्साहन द्या
धावणाऱ्यांना पाठिंबा दर्शविणे ही आपली जबाबदारी आहे, या भावनेतून बाहेर पडा. रस्त्याच्या कडेला उभे राहून धावणाऱ्यांच्या स्वागतासाठी तुतारीची ललकारी द्या, ढोलताशांचा दणदणाट करा, नऊवारी साडी नेसून धावपटूंवर फुलांचा वर्षाव करा, लेझिम पथक,भांगडा, रॉक्स बँड, विविध वेशभूषा याद्वारे उत्साह वाढवा. मॅरेथॉनच्या मार्गाशेजारी रांगोळ्या काढा, चौकाचौकात ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’, असे फलक घेऊन उभे रहा. आपल्या टाळ्यांचा उत्साह धावकांना कायम प्रोत्साहनपर ठरणार आहे.
अशी असेल पार्किंग व्यवस्था
रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे धावपटू, त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांसाठी आयोजकांतर्फे दोन ठिकाणी पार्किंंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी लॉ कॉलेज चौक येथील जी.एस. कॉमर्स कॉलेज परिसरात तसेच विद्यापीठ क्रीडांगणामागील रविनगरच्या शासकीय कर्मचारी वसाहतीत असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंग व्यवस्था राहील.
जी.एस. कॉमर्स कॉलेज : या महाविद्यालय परिसरातील मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. बर्डी, धरमपेठ या भागाकडून महामॅरेथॉनसाठी येणाºयांनी आपली वाहने जी.एस. कॉमर्स कॉलेजमध्ये पार्क करावीत. येथे स्वयंसेवक आणि सुरक्षा रक्षक वाहनधारकांना मार्गदर्शन करणार आहेत.
रविनगर वसाहत मैदान : शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातून महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºयांनी आपली वाहने रविनगर वसाहत मैदानावर पार्क करावीत. रविनगर चौकातील सेनगुप्ता हॉस्पिटलजवळून रविनगर वसाहीत प्रवेश केल्यानंतर दादाजी धुनिवाले मठाजवळून उजव्या बाजूला वळण घेत थोड्या अंतरावर डावे वळण येईल. आणखी पुढे गेल्यानंतर रविनगर वसाहत मैदानावर जाता येईल. याठिकाणी सहजपणे चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्क करता येणार आहेत. नागरिकांनी पार्किंगच्या ठिकाणीच आपली वाहने पार्क करण्यास सहकार्य करावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Web Title: The thrill of the marathon going on today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.