त्यांनी धडधडत्या रेल्वेसमोर सिनेस्टाईल उड्या घेतल्या अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 12:51 AM2021-02-26T00:51:20+5:302021-02-26T00:52:53+5:30

They took cinestyle jumps in front of the running train रोजमजुरीचे पैसे मिळाल्याने आनंदलेल्या त्या तीन युवकांनी खाण्यापिण्याचा बेत आखला अन् रेल्वेरुळाकडे निघाले. त्यांना ट्रॅक ओलांडायचा होता. रेल्वे तेवढ्यात धडधडत येत होती अन् सुसाट निघालेल्या या तरुणांनी रुळाच्या या काठावरून पलीकडे जाण्यासाठी एकसाथ उड्या घेतल्या.

They took cinestyle jumps in front of the running train and ... | त्यांनी धडधडत्या रेल्वेसमोर सिनेस्टाईल उड्या घेतल्या अन्...

त्यांनी धडधडत्या रेल्वेसमोर सिनेस्टाईल उड्या घेतल्या अन्...

Next
ठळक मुद्देदोघांचा मृत्यू , एक बचावला :  कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रोजमजुरीचे पैसे मिळाल्याने आनंदलेल्या त्या तीन युवकांनी खाण्यापिण्याचा बेत आखला अन् रेल्वेरुळाकडे निघाले. त्यांना ट्रॅक ओलांडायचा होता. रेल्वे तेवढ्यात धडधडत येत होती अन् सुसाट निघालेल्या या तरुणांनी रुळाच्या या काठावरून पलीकडे जाण्यासाठी एकसाथ उड्या घेतल्या. काही क्षणासाठी कुणाला काही कळलेच नाही. जेव्हा त्याला भान आले तेव्हा त्याच्यासोबतच्या दोघांचे देह तुकड्यांच्या रूपात इतस्तत: विखुरले होते. रेल्वे धडधडत पुढे निघून गेली होती. एखाद्या चित्रपटातील वाटावी अशी ही थरारक घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली.

ओमप्रकाश सदानंद साखरे (वय २४, रा. कृषीनगर, जरीपटका), काैशिक अरविंद कडवे (१८, रा. निर्मल कॉलनी, जरीपटका) अशी मृतांची नावे असून नशीब बलवत्तर असल्यामुळे बचावलेल्या तिसऱ्या युवकाचे नाव हर्ष आनंद सरोजकर (१८, रा. जरीपटका) आहे.

हे तिघेही रोजमजुरी करायचे. आज त्यांच्या कामाचे पैसे मिळाले. त्यामुळे रात्री ९ च्या सुमारास हर्ष हा पैसे देण्यासाठी साखरे आणि कडवेकडे गेला. कामाचे पैसे मिळाल्याने खाणेपिणे करण्याचा बेत त्यांनी आखला. त्यानुसार ते दिल्ली-नागपूर डाऊनलाइनच्या पलीकडे जायला निघाले. तिकडून रेल्वे धडधडत येत होती. तर, ती निघून जाण्यापूर्वीच आपण पटरी पार करू या विचाराने या तिघांनी सिनेमातील प्रसंगासारखे एकमेकांना प्रोत्साहित करत रेल्वे रुळावरून एकसाथ उड्या घेतल्या. धडधडत येणाऱ्या रेल्वेने कानठळ्या बसविणारा भोंगा वाजवला. रुळाच्या पलीकडे पडल्यानंतर हर्षला जेव्हा भान आले तेव्हा त्याच्या दोन्ही मित्रांच्या शरीराचे अनेक तुकडे झाले होते. आजूबाजूच्यांनी हा प्रकार बघितला अन् पोलिसांना माहिती कळविली. जरीपटका पोलीस तेथे पोहोचले. मात्र, घटनास्थळ कोराडीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती तिकडे कळविली. त्यानुसार, कोराडीचे ठाणेदार राजेश पुकळे आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. मानसिक धक्का बसलेल्या हर्षवर प्रथमोपचार करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली.

बघ्यांची प्रचंड गर्दी

या अपघाताने घटनास्थळ परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच त्या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती.

Web Title: They took cinestyle jumps in front of the running train and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.