घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:41 PM2020-03-28T23:41:34+5:302020-03-28T23:42:54+5:30

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहेत. लोकांमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

There is no reason to panic, there is no proliferation of corona in society: Commissioner Tukaram Mundhe | घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

Next
ठळक मुद्दे१४ दिवसात एक लाख लोकांचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहेत. लोकांमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
नागपुरात पूर्वी जे चार व्यक्ती कोरोनाबाधित होते त्यांच्यापैकी एक रुग्ण पूर्णत: बरा झाला असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. अन्य तीन रुग्णही बरे होत असून पुढील काही दिवसांत त्यांनाही घरी पाठविण्यात येईल. हे चारही रुग्ण परदेशातून आलेले होते. नव्याने जे पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यांच्यातील एक व्यक्ती आपल्या व्यवस्थापकासह दिल्लीला गेला होता. तेथून आल्यानंतर घरातील काहींच्या संपर्कात ते आले. त्या सर्वांची तपासणी करण्यात आली असून जे-जे पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.
मनपाची चमू आता पुन्हा एकदा लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या कोअर एरियामध्ये सर्वेक्षण करत आहे. पुढील १४ दिवसांपर्यंत मनपाच्या १८५ चमू २७,४६३ घरात राहणाऱ्या एक लाख लोकांचे सर्वेक्षण करणार आहे. सध्या आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरापासून एक कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील ही घरे आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती आढळतील त्यांच्यावर मनपाच्या आरोग्य विभागाची चमू लक्ष ठेवेल. असाच सर्व्हे आता संपूर्ण शहरातही सुरू असून सुमारे ४९५ चमू यासाठी कार्यरत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Web Title: There is no reason to panic, there is no proliferation of corona in society: Commissioner Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.