-तर मग वाघ बघणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:03 AM2019-11-08T11:03:05+5:302019-11-08T11:04:40+5:30

राष्ट्रीय वाघ अभयारण्य, चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह दीक्षाभूमी, ताजबाग, ड्रॅगन टेम्पल आदी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.

-Then how will see the tiger ? | -तर मग वाघ बघणार कसे?

-तर मग वाघ बघणार कसे?

Next
ठळक मुद्देजास्त दरानंतरही मिळत नाहीत हॉटेलात खोल्याऑनलाईन बुकिंगकंपन्यांसोबत करार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी आणि विधानसभा निवडणुकानंतर आता थंडीचा मोसम सुरू झाल्याने, देशाची ‘टायगर कॅपिटल’ असलेल्या नागपुरात पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत आहेत. राष्ट्रीय वाघ अभयारण्य, चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह दीक्षाभूमी, ताजबाग, ड्रॅगन टेम्पल आदी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. हॉटेल्सच्या काऊंटरवरूनच त्यांना परतावे लागत आहे. अखेर असे का होत आहे, याची पडताळणी लोकमतने केली आहे. यामध्ये काही रोचक तथ्य पुढे आले आहे.
नागपुरात किती रेसिडेन्सियल आणि किती स्टार वर्गवारीचे हॉटेल्स आहेत, हे माहीत असणे आवश्यक आहे. प्राप्त माहितीनुसार नागपुरात नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन आहे. नागपुरातील जवळपास ९३ हॉटेल्स या असोसिएशनचे सदस्य आहे. पण खरी बाब अशी की, नागपुरात यापेक्षा जास्त रेसिडेन्सियल हॉटेल्स आहेत. यामध्ये गेस्ट हाऊस आणि सर्व्हिस अपार्टमेंटचा समावेश आहे. यातील बहुतांश हॉटेल्स नोंदणीकृत नसल्यामुळे ते आताही प्रशासनाच्या यादीत नाहीत. नागपुरात तीन ते पाच स्टार वर्गवारीतील हॉटेल्स आहेत. यामध्ये हॉटेल रेडिसन ब्ल्यू, ली मेरिडियन, सेंटर पॉर्इंट या हॉटेल्सचा समावेश आहे. या दिवसात पर्यटकांना हॉटेल्समध्ये खोल्या उपलब्ध का नाही, यावर चर्चा करणे आवश्यक आहे. यासंदर्भात माहिती देताना या क्षेत्रातील मान्यवरांनी सांगितले की, नीरी संस्थानमध्ये या दिवसात कॉन्फरन्स होते. यामध्ये देश-विदेशातील प्रतिनिधी येतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था हॉॅटेल्समध्ये करण्यात येते. तसेच या दिवसात दुसऱ्या शहरांमध्येही मोठी कॉन्फरन्स सुरू आहे. १० नोव्हेंबरला भारत-बांगला देशमध्ये जामठा येथे टी-२० क्रिकेट सामना आहे. राष्ट्रीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोव्हिजन २२ ते २५ नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.
या सर्व आयोजनामुळे हॉटेल्समध्ये प्री-बुकिंग असल्यामुळे या दिवसात पर्यटकांना आणि अन्य नागरिकांना जास्त दरातही खोल्या मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. खोल्या न मिळण्याचे दुसरे कारण असे की, अनेक हॉटेल्सच्या संचालकांनी खासगी कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यामुळे संचालकांना संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना खोल्या प्रारंभी उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्यामुळे अनेक हॉटेल्समधील बहुतांश खोल्या पूर्वीच बुक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच पर्यटकांचा नागपूरकडे ओढा बघता देशातील ऑनलाईन कंपन्यांकडून बुक पर्यटक खोल्या बुक करीत आहेत, तर वेळेवर नागपुरात आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा येत आहे.

नागपुरात विविध इव्हेंटसाठी हॉटेल्समध्ये खोल्यांची प्री-बुकिंग होते. त्याचा परिणाम खोल्यांच्या उपलब्धतेवर होतो. विविध हॉटेल्सतर्फे खासगी कंपन्यांशी बिझनेस करार केल्यामुळे खासगी कंपन्यांच्या पोर्टलवर ऑनलाईन खोल्या उपलब्ध होतात. त्यामुळे हॉटेल्सच्या काऊंटरवर लोकांना खोल्या मिळत नाही. अशी स्थिती शहरातील सर्व हॉटेल्समध्ये दिसून येत आहे.
- तेजिंदरसिंह रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.

Web Title: -Then how will see the tiger ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ