... तर न्यायाधीशांकडे क्लीप सोपविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:41 PM2020-07-18T23:41:49+5:302020-07-18T23:45:30+5:30

महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा दावा करणाऱ्या व्हायरल झालेल्या ‘ऑडिओ क्लीप’वरून राजकारणात खळबळ उडाली आहे. अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

... then hand over the clip to the judge | ... तर न्यायाधीशांकडे क्लीप सोपविणार

... तर न्यायाधीशांकडे क्लीप सोपविणार

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा गृहमंत्र्यांना पत्र निष्पक्ष चौकशीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा दावा करणाऱ्या व्हायरल झालेल्या ‘ऑडिओ क्लीप’वरून राजकारणात खळबळ उडाली आहे. अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणात राजकारण होत आहे, हे योग्य नाही. अशीच परिस्थिती राहिली तर मी स्वत: मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांच्याकडे आॅडिओ क्लीप सादर करीत चौकशीची मागणी करेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
या क्लीपमुळे चर्चेत आलेल्या साहिल सय्यद याच्यावरून सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्हीकडून दावा केला जात आहे की, साहिल हा त्यांचा आहे. यासाठी पुरावा म्हणून साहिलचे विविध नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल केले जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांना पत्र लिहून ‘साहिल सय्यद याचे प्रदेश भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. पक्षातील अंतर्गत वादातून हे सर्व होत आहे. आता फडणवीस यांनी देशमुख यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या व्यक्तीचे कुणा व्यक्तीसोबत फोटो आहे, याचा अर्थ त्या दोघांमध्ये संबंध आहेत असा होत नाही. आरोपीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतही फोटो आहेत. संबंधित क्लीपमध्ये न्यायव्यवस्थेवरच टिप्पणी केली आहे. हा गंभीर विषय आहे. परंतु आता राजकारण होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पत्र लिहिले होते. परंतु त्याच्या उत्तरात भाजप नेत्यांवरच आरोप लावण्यात आल्याचे सांगत यावर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: ... then hand over the clip to the judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.