Tense in Mayo hospital due to not receiving the suitable treatment | जखमीला योग्य उपचार न मिळाल्याने मेयोत तणाव
जखमीला योग्य उपचार न मिळाल्याने मेयोत तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ता अपघातात जखमी युवकास इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे योग्य उपचार न मिळाल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर कुटुंबीयांनी जखमीला खासगी रुगणालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मेंडोले (२०) हा विद्यार्थी असून शिकण्याबरोबरच टॅक्सीही चालवतो. बुधवारी रात्री काम संपवून ज्ञानेश्वर बाईकने (एमएच३१/बी.एस./९२४)ने घरी जात होता. ८.१५ वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाणे हद्दीत एम.एच. ३१/डी.सी. ३८३० क्रमाकांच्या कार चालकाने त्याला धडक दिली. यात तो जखमी झाला. तेथे उपस्थित हरदीपसिंग भाटिय आणि इतर लोक जखमी ज्ञानेश्वरला उपचारासाठी मेया रुग्णालयात घेऊन गेले.
त्यांनी केलेल्या आरोपानुसार ज्ञानेश्वरची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहिल्यानंतरही तिथे त्याच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले नाही. ज्ञानेश्वरसोबत आलेल्या लोकांनी डॉक्टरांना त्याला पाहण्याची अनेकदा विनंती केली, परंतु कुणीही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे लोक संतप्त झाले. परिस्थिती तणावपूर्ण झाली. दरम्यान, ज्ञानेश्वरला आॅक्सिजन लावण्यात आले. परंतु त्यानंतरही ज्ञानेश्वरवर योग्य उपचार होत नसल्याचे निदर्शनास आल्याने अखेर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांनी ज्ञानेश्वरला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले.


Web Title: Tense in Mayo hospital due to not receiving the suitable treatment
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.