दहा महिला सर करणार साडेचार हजार किलोमीटरच्या पर्वतरांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 07:00 AM2022-01-25T07:00:00+5:302022-01-25T07:00:02+5:30

Wardha News अरुणाचल प्रदेश ते लडाख असा साडेचार हजार किलोमीटर आणि सुमारे ४० पर्वतरांगा पार करण्याची साहसी मोहीम राबविण्याचा निर्णय माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक पद्मभूषण आणि पद्मश्री बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Ten women will cover four and a half thousand kilometers of mountains | दहा महिला सर करणार साडेचार हजार किलोमीटरच्या पर्वतरांगा

दहा महिला सर करणार साडेचार हजार किलोमीटरच्या पर्वतरांगा

Next
ठळक मुद्देमार्च महिन्यापासून सुरू होणार साहसी मोहीम

सेवाग्राम : वयाची पन्नास वर्षे पार केलेल्या महिलासुद्धा फिट असतात आणि त्या आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतात. हे दाखवण्यासाठी अरुणाचल प्रदेश ते लडाख असा साडेचार हजार किलोमीटर आणि सुमारे ४० पर्वतरांगा पार करण्याची साहसी मोहीम राबविण्याचा निर्णय माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक पद्मभूषण आणि पद्मश्री बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मार्च महिन्यात देशभरातील दहा महिलांना घेऊन ही मोहीम पूर्ण करण्याचा निर्धार केला.

सेलू तालुक्यातील ज्ञान भारती कौशल्य विकास केंद्र येथे ही बैठक पार पडली. फिट ५० प्लस महिला ट्रान्स हिमालयन मोहीम आणि २०२२ आझादीचा अमृत महोत्सवला अर्पण करणाऱ्या साहसपूर्ण मोहिमेत ४० पर्वतरांगा सर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या मोहिमेत भारतातील ५० आणि ६० वयोगटातील केवळ १० महिला सहभागी असतील. टाटा स्टील ॲडव्हेंचर फाऊंडेशनद्वारे या मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. यात सहभागी होणाऱ्या १० सदस्यांच्या टीमने एक छोटासा ट्रेक केला. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीही संवाद साधला. शाळेच्या आणि कॉलेजच्या दिवसांतील एनसीसी आणि साहसी उपक्रमांच्या आठवणींना उजळला मिळाला. ‘तुमच्या सारखी पिढी केवळ माझ्यासारख्यांसाठी नाही तर सध्याच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे’ असे मत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त करून गिर्यारोहक बचेंद्री पाल यांना या साहसी मोहिमेकरिता शुभेच्छा दिल्या.

कोरोनामुळे लांबली मोहीम

ही साहसी मोहीम नोव्हेंबर २०२० मध्येच ठरली होती. मार्च २०२१ मध्ये मोहिमेला सुरुवात होणार होती. परंतु कोरोनाचे निर्बंध लादल्या गेल्याने संपूर्ण देश स्तब्ध झाला. परिणामी ही मोहीमही बारगळली. पण, आता पुन्हा नव्या जोमाने या मोहिमेला सुरुवात होणार असून मार्च २०२२ मध्ये सुरुवात करून जवळपास ५ महिने चालणार आहे. यासंदर्भात ही बैठक आयोजन करून मोहिमेतील प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे. पर्वतरांगा पार करताना येणारे अडथळे, सोबत न्यावे लागणारे साहित्य, जीवनावश्यक वस्तू, गरम कपडे यासह ही मोहीम सर करताना विशेष काळजी घेण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

या साहसी महिलांचा असणार सहभाग

गिर्यारोहक पद्मभूषण आणि पद्मश्री बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविली जाणर असून यामध्ये वेस्ट बंगाल कोलकाताच्या चेतना साहू, भिलाई छत्तीसगडच्या सविता धपवाल, कर्नाटक मसूरच्या श्यामला पद्मनाभन, बडोदा गुजरातच्या गंगोत्री सोनेज, पालनपूर गुजरातच्या चौला जागीरदार, पोयो मुरमू, डॉ. सुषमा बीसा, क्रिष्णा दुबे या साहसी महिला सहभागी होणार आहेत.

Web Title: Ten women will cover four and a half thousand kilometers of mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.