अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा : महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:25 AM2020-01-23T00:25:43+5:302020-01-23T00:27:23+5:30

नागरिकांच्याही सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणबाबतच आहेत. अतिक्रमण संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन यावर तातडीने कारवाई करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी दिले.

Take immediate action on encroachments: Mayor's instructions | अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा : महापौरांचे निर्देश

अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा : महापौरांचे निर्देश

Next
ठळक मुद्देधरमपेठ झोनमधील जनता दरबारात ९१ तक्रारींवर सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठ झोनमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठाने, कोचिंग क्लासेस, हॉटेल्स, हॉस्पिटलआदींमुळे होणाऱ्या अतिक्रमणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्याही सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणबाबतच आहेत. अतिक्रमण संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन यावर तातडीने कारवाई करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी दिले.
धरमपेठ झोनमधील जनता दरबारात महापौरांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी झोन सभापती अमर बागडे, नगरसेवक सुनील अग्रवाल,संजय बंगाले, निशांत गांधी, विक्रम ग्वालबंशी, प्रमोद कौरती, रूपा राय, प्रगती पाटील, वर्षा ठाकरे, परिणीता फुके, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जनता दरबारात ९१ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. अतिक्रमण, प्रदूषण, पार्किंग, मलवाहिनी, कचरा, केबलसाठी खोदलेले खड्डे, विद्युत दिवे, उद्यानांमधील असुविधा अशा विविध विषयांवरील तक्रारींचा यात समावेश होता. मांडण्यात आल्या. अतिक्रमणच्या सर्वाधिक तक्रारी मांडण्यात आल्या. गोकुळपेठ मार्के ट येथे अतिक्रमण करून भाजी विक्री, गोकुळपेठ येथील कांजी हाउस, स्मृतीगंध व जय बजरंग सोसायटी तेलंगखेडी येथील अनधिकृत बांधकाम, झेंडा चौक, आदिवासी सोसायटी वृंदावन कॉलनी, हजारी पहाड, तेलंगखेडी, खरे टाउन नारायण अपार्टमेंट येथील अतिक्रमण अशा विविध ठिकाणच्या अतिक्रमणच्या समस्यांशी यावेळी अवगत करण्यात आले.
अतिक्रमणाच्या ठिकाणी मोका पाहणी करून अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. क्रिम्स हॉस्पिटलपुढे वाहने उभी ठेवतात. यामुळे परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली. आंबेडकरनगर येथील गडरलाईन चोक होत असल्याच्या तक्रारीसंदर्भात स्वच्छता निरीक्षकासह मोका पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. गांधीनगर येथील मैदानाला सुरक्षा भिंत नसल्याने सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. त्यामुळे मैदानाला सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी यावेळी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात आली. जागृती कॉलनी भारतीय बौध्द महासभा येथे सार्वजनिक वाचनालय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. तुटलेली सिवर लाईन, नवीन सिवर लाईन टाकणे, पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून पावसाळी नालीची निर्मिती यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात येत्या ७ दिवसांमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

Web Title: Take immediate action on encroachments: Mayor's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.