वकिलांवरील हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 10:11 PM2019-11-04T22:11:34+5:302019-11-04T22:13:26+5:30

नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर व इतर दोषींवर कडक कारवाई आणि घटनेची पारदर्शी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी करण्यात आली.

Take action on the perpetrators of the attack on lawyers | वकिलांवरील हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा 

वकिलांवरील हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा 

Next
ठळक मुद्देनागपुरातील निषेध आंदोलनात मागणी : तीस हजारी न्यायालयातील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर व इतर दोषींवर कडक कारवाई आणि घटनेची पारदर्शी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी करण्यात आली.
शहरातील वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा व सत्र न्यायालयापुढे आंदोलन केले. दरम्यान, त्यांनी ही मागणी केली. तसेच, दिल्ली पोलिसांविरुद्ध नारे दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या विधी शाखेचे सचिव अ‍ॅड. अक्षय समर्थ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात अ‍ॅड. अभय रणदिवे, अ‍ॅड. उज्ज्वल राऊत, अ‍ॅड. शबाना दिवाण, अ‍ॅड. प्रकाश तिवारी, अ‍ॅड. प्रफुल्ल सोनुले, अ‍ॅड. कविता मून, अ‍ॅड. शादाब खान, अ‍ॅड. श्याम शाहू, अ‍ॅड. ओमप्रकाश यादव, अ‍ॅड. सुनील लाचरवार, अ‍ॅड. सुरेश शिंदे, अ‍ॅड. बाबा बाबुळे, अ‍ॅड. विलास राऊत, अ‍ॅड. सुधाकर तागडे, अ‍ॅड. तिलक लारोकर, अ‍ॅड. कुलश्री भांगे, अ‍ॅड. सुनीता पॉल, अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय, अ‍ॅड. प्रिया गोंडाणे आदी वकील सहभागी झाले होते.

एचसीबीए, डीबीए करणार निषेध
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन या दोन संघटनाही या घटनेचा निषेध करणार आहेत. हायकोर्ट बार असोसिएशन मंगळवारी निषेध नोटीस जारी करणार आहे, असे अध्यक्ष अ‍ॅड. गौरी वेंकटरमण यांनी सांगितले तर, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे सदस्य येत्या बुधवारी काळ्या कोटाच्या बाह्यांना लाल रिबीन बांधून न्यायालयात काम करतील व दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयापुढे निषेध आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती डीबीए अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांनी दिली.

Web Title: Take action on the perpetrators of the attack on lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.