तडीपार आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:16+5:302021-05-16T04:09:16+5:30

कामठी : तडीपार करण्यात आलेला आराेपी शहरात दाखल झाल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई ...

Tadipar accused arrested | तडीपार आरोपी अटकेत

तडीपार आरोपी अटकेत

Next

कामठी : तडीपार करण्यात आलेला आराेपी शहरात दाखल झाल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. १४) रात्री करण्यात आली.

फाजील अहमद फय्याज अहमद (२८, रा. लकडगंज, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार आराेपीचे नाव आहे. त्याच्या विराेधात अवैध गाेवंश वाहतूक, चाेरी, शिवीगाळ करणे यांसह अन्य गंभीर गुन्ह्यांची नाेंद आहे. त्याला वारंवार समज दिल्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने २७ ऑगस्ट २०१९ राेजी नागपूर शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले हाेते. ताे काही दिवसांपासून कामठी शहरात वास्तव्याला असल्याची माहिती मिळताच कामठी (नवीन) पाेलिसांनी त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, ताे त्याच्या घरी असल्याचे कळताच पाेलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता यांच्या पथकाने केली.

Web Title: Tadipar accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.