विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 11:03 PM2019-12-02T23:03:16+5:302019-12-02T23:07:22+5:30

सीए फाऊंडेशनच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या घरी खोलीत छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

Suicide by strangling a student | विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

Next
ठळक मुद्देकारण अस्पष्ट : कामठी शहरातील घटनासीए फाऊंडेशनच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : सीए फाऊंडेशनच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या घरी खोलीत छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे मूळ कारण कळू शकले नाही. ही घटना कामठी शहरात सोमवारी (दि. २) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सुजेश राजेश कनोजिया (२२, रा. स्वामी विवेकानंद नगर, हमालपुरा, कामठी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सुजेश हा नागपूर येथे सीए फाऊंडेशनचे शिक्षण घेत होता. त्याला सोमवारी शिकवणीसाठी मुंबईला जावयाचे होते. दुपारी जेवण केल्यानंतर तो विश्रांती करण्यासाठी खोलीत केला. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने आईने त्याला आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने तिने दार ठोठावले. त्याचाही उपयोग न झाल्याने तिने जोरात धक्का देत दार उघडले.
तेव्हा तिला सुजेश छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने आरडाओरड करताच शेजारी धावून आले. त्यांनी सुजेशला खाली उतरवून जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्याने सदर पाऊल का उचलले, हे कळायला मार्ग नाही. या प्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Suicide by strangling a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.