महिनाभरात ऑटो स्टॅण्डचे प्रस्ताव सादर करा : महापौरांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:49 AM2021-02-23T00:49:06+5:302021-02-23T00:51:24+5:30

Auto stand proposal पुढील एक महिन्यात नवीन वसाहतीप्रमाणे पहाणी करून ऑटो स्टॅण्डचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी दिले.

Submit auto stand proposal within a month: Mayor's instructions | महिनाभरात ऑटो स्टॅण्डचे प्रस्ताव सादर करा : महापौरांचे निर्देश 

महिनाभरात ऑटो स्टॅण्डचे प्रस्ताव सादर करा : महापौरांचे निर्देश 

Next
ठळक मुद्देनागपूर शहरातील ऑटो स्टॅण्डच्या जागेसंबंधात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरात ऑटो स्टॅण्ड आणि पार्किंगची योग्य व्‍यवस्था करणे गरजेचे आहे. यासाठी पुढील एक महिन्यात नवीन वसाहतीप्रमाणे पहाणी करून ऑटो स्टॅण्डचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी दिले. महापौरांनी ओला, उबेर वाहनांना जागा उपलब्ध करणे, तसेच शहरात असलेल्या ऑटो स्टॅण्डच्या जागासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

शहरात असलेले २५५ ऑटो स्टॅण्ड याव्यतिरिक्त नवीन वसाहतीमध्ये पाहणी करून एक महिन्यात नवीन स्टॅण्डसाठी जागेचे प्रस्ताव सादर करा, यासाठी परिसरातील नागरिक संघटना, ऑटो संघटनांशी चर्चा करण्याची सूचना दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केली. शहरात असलेल्या ऑटो स्टॅण्ड व्‍यतिरिक्त गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टॅण्ड, शहरातील विविध मार्केट परिसर) ओला,उबेरसाठी नवीन स्टॅण्ड तयार करण्यात यावे, तसेच रेल्वे स्टेशन वर ओला,उबेर टॅक्सींना प्रवेश मिळावा, यासाठीसुद्धा महापौरांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली. इतवारी, गांधीबागसारख्या परिसरात मालवाहक वाहनांसाठी स्टॅण्ड उपलब्ध करण्याची सूचना केली.

शहरात अनेक ठिकाणी अवैध पार्किंग केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक ठप्प होत आहे. यावर तोडगा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक नियोजन अधिकारी आणि पोलीस निरिक्षक (वाहतूक) यांनी संयुक्तरित्या परिसराची पाहणी करावी. अवैध पार्किंग करणाऱ्या नागरिकांवर करवाई करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले. नागरिकांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देणारे सायकल ट्रेकवर काही नागरिकांनी आपल्या वाहनांची पार्किंग करणे सुरु केले आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या महाव्‍यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी दिली. यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, सत्तापक्ष प्रतोद दिव्‍या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, वाहतूक नियोजन अधिकारी शकिल नियाजी, पोलीस निरीक्षक (वाहतूक) अजयकुमार मालवीया, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Submit auto stand proposal within a month: Mayor's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.