मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:37 PM2022-06-28T13:37:41+5:302022-06-28T13:38:47+5:30

भाविकांच्या सुविधेसाठी ६ ते ११ जुलै दरम्यान नागपूर-मिरज-नागपूर आणि नागपूर-पंढरपूर-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Special trains for Ashadi by Central Railway | मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय

मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय

Next

नागपूर: मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी ६ ते ११ जुलै दरम्यान नागपूर-मिरज-नागपूर आणि नागपूर-पंढरपूर-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१११५ नागपूर-मिरज आषाढी विशेष ६ आणि ९ जुलैला नागपूर रेल्वेस्थानकावरून सकाळी ८.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१११६ मिरज-नागपूर आषाढी विशेष रेल्वेगाडी ७ व १० जुलैला दुपारी १२.५५ वाजता मिरजवरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल.

Web Title: Special trains for Ashadi by Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.