रामगिरीवर तीन तर मुंडेंच्या बंगल्यात दोन वेळा निघाले साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:16 AM2018-07-22T01:16:18+5:302018-07-22T01:19:03+5:30

पावसाळी अधिवेशनादरम्यान रामगिरी व राजभवनसह विधानभवन परिसर, रविभवन व नागभवनात एकूण नऊ साप निघाले. यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीत तीन, तर पंकजा मुंडे यांच्या कॉटेजमध्ये दोनदा साप निघाला.

Snake found three times in Ramgiris and two times in the Munda's bungalow | रामगिरीवर तीन तर मुंडेंच्या बंगल्यात दोन वेळा निघाले साप

रामगिरीवर तीन तर मुंडेंच्या बंगल्यात दोन वेळा निघाले साप

Next
ठळक मुद्देअधिवेशन काळात नऊ साप : सर्पमित्रांची तैनाती कामात आली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळी अधिवेशनादरम्यान रामगिरी व राजभवनसह विधानभवन परिसर, रविभवन व नागभवनात एकूण नऊ साप निघाले. यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीत तीन, तर पंकजा मुंडे यांच्या कॉटेजमध्ये दोनदा साप निघाला. यासोबतच राजभवनात साडे आठ फुटची धामण सापडली. यादरम्यान सर्प मित्रांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली. कुणालाही इजा होऊ न देता सर्व सर्पांना पकडून वनांमध्ये सुरक्षित सोडले.
रामगिरी, राजभवन, विधानभवन, आमदार निवास, रविभवन व नागभवन या परिसरात वर्षभर वर्दळ नसते. तसेच परिसरत हिरवळ असते. पावसाळा असल्याने या ठिकाणी साप असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. लोकमतने यासंदर्भात प्रशासनाचे लक्षही वेधले होते. सार्वजनिक बांधकाम विभगानेही याची गंभीर दखल घेत. अधिवेशन काळात सर्पमित्रांची मदत घेण्याचे ठरविले. तसेच काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले.
वर्तविण्यात आलेल्या शक्यतेप्रमाणे अधिवेशन सुरु होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे धामण निघाली. अधिवेशन काळात रामगिरीवर एकूण तीन वेळा साप निघाले. राजभवन येथे साडे आठ फुटाची धामण पकडण्यात आली. यानंतर पंकजा मुंडे यांच्या रविभवन येथील कॉटेज २१ जवळ दोन वेळा साप निघाला. यासोबतच विधानभवन, व देवगिरीमध्येही साप पकडण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, कार्यकरी अभियंता जनार्दन भानुसे, उपअभियंता चंद्रशेखर गिरी, अजय पाटील, संजय सतदेवे, मुकुल देशकर, बारई आदींसह वन विभागाचे मल्लिकार्जुन व निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात सर्पमित्र राज चव्हाण, विशाल डंभारे, साहील शरणागत आणि रकेश भोयर यांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली.

Web Title: Snake found three times in Ramgiris and two times in the Munda's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.