नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:04 AM2019-10-24T00:04:15+5:302019-10-24T00:06:27+5:30

दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या.

Six fire incidents in Nagpur in 10 years: 19 fire caused by fireworks | नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी

नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी

Next
ठळक मुद्देफटाके फोडताना खबरदारी घेण्याचे मनपाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परंतु यादरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या क्षणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. विशेषत: फटाके उडविताना प्रत्येकाने सावधता बाळगावी, असे आवाहन अग्शिनमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या कालावधीत फटक्यांमुळे आगीच्या घटना घडतात. यात दुर्घटनांचा समावेश असतो. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. फटाके उडविताना दाट वस्तीच्या ठिकाणी उडवू नये, रस्त्यावर फटाके उडविताना रस्ता निर्मनुष्य असल्याची खात्री करण्यात यावी. मोठ्या आवाजाचे फटाके उडवू नये, हातात धरून फटाके उडवू नये, फटाके उडविताना सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहनही अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधा
दिवाळी साजरी करताना अनपेक्षितपणे घडणाºया दुर्घटनांवर आळा आणण्यासाठी मनपा अग्निशमन विभाग तत्पर आहे. अनुचित घटनांप्रसंगी मदतीसाठी अग्निशमन पथक सज्ज असून आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन सेवेसाठी ०७१२-२५६७७७७,०७१२-२५६७१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनापातर्फे करण्यात आले आहे. दिवाळी सणाचा आनंद लहान थोरांच्या चेहऱ्यावर कायम राहावा यासाठी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाची चमू अविरत कार्यरत आहे.

प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करा
मागील दहा वर्षांमध्ये दिवाळीदरम्यान फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीदरम्यान दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. अशा घटनांवर निर्बंध यावे यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता प्रदूषण विरहीत फटाके उडवून दिवाळी साजरी करावी व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा.
अभिजित बांगर, आयुक्त महापालिका

फटाक्यामुळे घडलेल्या आगीच्या घटना
वर्ष           घटना
२००९         ५
२०१०         ०
२०११         ५
२०१२         ९
२०१३         ५
२०१४        ४
२०१५        ५
२०१६        ६
२०१७        ८
२०१८         २
एकूण ४९

Web Title: Six fire incidents in Nagpur in 10 years: 19 fire caused by fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.