साहेब, भूख से सभी डरते है।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:42 AM2020-09-14T10:42:12+5:302020-09-14T10:43:54+5:30

सेक्स वर्कर्सना या महामारीने खऱ्याखुऱ्या स्वरूपात रस्त्यावर आणले आहे. आज त्या दोन वेळेच्या जेवणासाठी जीवघेणा धोका पत्करून शरीर विकायला तयार आहेत. मात्र ग्राहकच फिरकेनासे झाल्याने या बिचाऱ्यांच्या वाट्याला नुसतीच अगतिकता आली आहे.

Sir, everyone is afraid of hunger. | साहेब, भूख से सभी डरते है।

साहेब, भूख से सभी डरते है।

Next

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : 
आँखे, ओठ, दिल और चेहरा,

इनकीही सब तारीफ करते है।
पेट का जिकर कोई नही करता,

हे जळजळीत वास्तव आहे रेडलाईट एरियातील !
'कोरोना' या एका शब्दाने लोकांना भयक्रांत करून सोडले आहे. स्पर्श सोडाच एकमेकांना भेटणेही संशयी झाले आहे. पण, स्पर्शानेच ज्यांचे पोट चालते त्या सेक्स वर्कर्सना या महामारीने खऱ्याखुऱ्या स्वरूपात रस्त्यावर आणले आहे. आज त्या दोन वेळेच्या जेवणासाठी जीवघेणा धोका पत्करून शरीर विकायला तयार आहेत. मात्र ग्राहकच फिरकेनासे झाल्याने या बिचाऱ्यांच्या वाट्याला नुसतीच अगतिकता आली आहे.

वारंवार झालेला बलात्कार, विश्वासघात, प्रेम प्रकरणातून झालेली फसगत, लादलेले मातृत्व अन जिकडेतिकडे खायला उठत असल्याचा अनुभव पदरी पडल्यामुळे महिला-मुली वेश्या व्यवसाय करण्यास बाध्य होतात. नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर या संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात (मुंबई वगळता) वेगवेगळ्या शहरात सुमारे दीड ते दोन लाख सेक्स वर्कर देहविक्रयाचा व्यवसाय करतात. हा आकडा कमीजास्त होत राहतो.
नागपूरच्या गंगाजमुनात मार्चपर्यंत सुमारे तीन हजार वारांगनांचे सारे काही ठीक होते. आता नुसतेच मूक आक्रंदन आहे. येथील वारांगनाजवळचा पै- पैका संपल्यामुळे आता कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. फूड पॅकेट काय, कुणी चहाही द्यायला तयार नाही. म्हणूनच जगण्यासाठी त्या मरणाचा (कोरोना) धोका पत्करायला तयार आहेत.

दुसरे कोणतेही काम त्या करू शकत नाहीत. त्यांना कुणी काम देईल, ही शाश्वतीही नाही. त्यामुळे सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत ग्राहकांच्या प्रतीक्षेत त्या अगतिकपणे उभ्या दिसतात. ग्राहक येईल आणि दोन वेळेच्या जेवणाची सोय होईल, या अपेक्षेवर त्या ग्राहकांची जीवघेणी प्रतीक्षा करतात. मात्र, एकटदुकटच ग्राहक फिरकत असल्याने अनेकींना पाण्याच्या घोटासोबत भुकेचा आगडोंब पोटात घेऊन झोपावे लागत आहे.

सारेच मार्ग बंद
वारांगनाचा औषधोपचार आणि समुपदेशनाचे कार्य ‘रेडक्रॉस सोसायटी’ तर्फे केले जाते. सोसायटीच्या प्रमुख हेमलता लोहवे येथील वारांगनांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे सांगतात. पैसा नाही आणि ग्राहकही नाही. त्यात मदतीचे सर्वच मार्ग बंद झाल्यामुळे रोजच्या जगण्यासाठी त्यांची धडपड सुरु असल्याचे सांगतात.

येईल का कुणी पुढे ?
त्यांना फक्त दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था हवी आहे. कोणती भली माणसं त्यासाठी पुढाकार घेतात, याकडे त्यांची नजर लागली आहे.

Web Title: Sir, everyone is afraid of hunger.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.