धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:41 PM2020-04-10T21:41:19+5:302020-04-10T21:44:45+5:30

सतरंजीपुऱ्यातील कोरोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. त्याच दिवशी त्यांच्यासोबत राहणारा ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी, ३५ वर्षीय जावई त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ वर्षाची दोन मुले असे एकूण ६ संशयितांना मेडिकलमधील ‘कोव्हीड-१९’ वॉर्डात दाखल केले. आज त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले.

Shocking! Six positives of the same family in Nagpur | धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह

धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देदोन संशयित मृताचा अहवाल निगेटिव्हमेयो, मेडिकलमधील ५९ नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी एकाच दिवशी कोरोना विषाणूची लागण झालेल्या ६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने नागपुरात रुग्णांची संख्या २५ वर गेली आहे. हे रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यात ८ व १२ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या सर्वांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. गुरुवारी कोरोना संशयित म्हणून मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सतरंजीपुऱ्यातील कोरोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. त्याच दिवशी त्यांच्यासोबत राहणारा ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी, मृतकाचा ३५ वर्षीय जावई त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ वर्षाची दोन मुले असे एकूण ६ संशयितांना मेडिकलमधील ‘कोव्हीड-१९’ वॉर्डात दाखल केले. आज त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले. एकाच दिवशी कोरोनाचे ६ नमुने पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शुक्रवारी मेयो व मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नागपुरातील ५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. -मेडिकलमध्ये ४४ रुग्ण संशयितमेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये २१ संशयित रुग्ण भरती आहेत. तीन नवीन तर १८ जुने रुग्ण आहेत. यात १५ पुरुष व ६ महिला आहेत. वॉर्ड ४९ मध्ये एकूण २३ संशयित रुग्ण आहेत. यात ११ पुरुष, १० महिला व दोन लहान मुले आहेत. एकूण ४४ संशयित रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ रुग्णाचाही यात समावेश आहे. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.-चार दिवसानंतर बाधिताच्या नमुन्यांची चाचणी मृतकाचे नमुने पॉझिटिव्ह येताच त्याच दिवशी त्यांच्या घरातील सहा जणांना मेडिकलमध्ये दाखल केले. परंतु त्यांच्या नमुन्याचा अहवाल यायला चार दिवसांचा कालावधी लागला. पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णांचे आधिच नमुने तपासले गेले असते तर आतापर्यंत त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासून यांचीही साखळी खंडीत करता आली असती, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.-त्या दोघांचा मृत्यू निमोनिआमुळे कोरोना संशयित म्हणून गुरुवारी मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या दोन्ही मृतकाचे नमुने निगेटिव्ह आले. यात एक पारशिवनी येथील १२ वर्षाचा मुलगा तर नागपुरातील ५८ वर्षीय पुरुष होता. दोघांना विविध आजारासोबतच निमोनिआ असल्याचे निदान झाले. याच आजारामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Shocking! Six positives of the same family in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.