मनपा शिक्षकांना लवकरच सातवा वेतन आयोग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:10 PM2020-01-21T23:10:14+5:302020-01-21T23:11:32+5:30

महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली.

Seventh pay commission to Municipal teachers soon | मनपा शिक्षकांना लवकरच सातवा वेतन आयोग 

मनपा शिक्षकांना लवकरच सातवा वेतन आयोग 

Next
ठळक मुद्देमहापौरांचे आश्वासन : ८४ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मिळणार

लोकमत न्यूज नेवटर्क
नागपूर: महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली. शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर महापौर कक्षात चर्चा करण्यात आली.
८४ महिन्यांची महागाई भत्त्याची थकीत रक्कम जानेवारी पेड इन फेब्रुवारी २०२० पासून प्रत्येक महिन्याच्या वेतनात देण्याचे, शाळा निरीक्षक, क्रीडा अधिकारी यांची पदे भरण्याचे निर्देश जोशी यांनी दिले. शिक्षण विभागाला बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पाच्या ४ टक्के तरतूद करण्याचे आश्वासन दिले. तसेच ५२ कोटींची भविष्य निर्वाह निधीची रक्कम शिक्षण व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळते करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, सत्ता पक्षनेते संदीप जाधव, अप्पर आयुक्त राम जोशी, उपआयुक्त महेश धामेचा, शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर तसेच संघाचे अध्यक्ष राजेश गवरे, प्रमुख सचिव देवराव मांडवकर, विनायक कुथे, मधुकर भोयर, माला कामडे, विकास कामडी, अशोक बालपांडे, कल्पना महल्ले, सुभाष उपासे, माला बावणे, नूरसत खालीद, परवीन सिद्दीकी, सुभाष उपासे, प्रभू चरडे, कांजी नुरुल लतीफ, सिंधू तागडे, मलका मुनीर अली, माया गेडाम, विजय बरडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Seventh pay commission to Municipal teachers soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.