नागपूर : नागपूर- कामठी रोडवर आशा हॉस्पिटलच्या जवळ सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली आहे. कामठीचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा आरोप माजी मंत्री ऍड. सुलेखा कुंभारे यांनी केला होता.
त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत बनावाट व्होटर आयडी आणि बोटावरची शाई मिटवण्याचे द्रव्य आढळून आले आहे. या फार्म हाऊसवर बनावट व्होटर कार्ड व बोगस मतदार आढळून आल्याचा आरोप आहे. गोंधळ सुरू आहे.
याच कामठी येथे स्थानिक लाला ओळीत मतदार केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ युवकांना नागरिकांच्या सहाय्याने पोलिसांनी पकडले. बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणारे सर्व युवक कन्हान येथील वाघधरे वाडीतील आहेत. प्रत्येकांना दोन दोनशे रुपये देऊन घडीला मतदान करण्यास सांगितले असल्याचे या युवकांनी सांगितले. सर्व युवकांना पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.
Web Summary : BJP candidate Ajay Agarwal faces bogus voting accusations. Authorities raided a farmhouse, finding fake IDs and ink remover. Twelve youths were apprehended attempting fraudulent voting at a polling station, alleging payment for their actions.
Web Summary : भाजपा उम्मीदवार अजय अग्रवाल पर फर्जी मतदान का आरोप। फार्महाउस पर छापे में नकली आईडी और स्याही हटाने का सामान मिला। बारह युवकों को मतदान केंद्र पर धोखाधड़ी करते पकड़ा गया, जिन्होंने पैसे लेकर मतदान करने का आरोप लगाया।