मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:37 AM2020-04-03T10:37:39+5:302020-04-03T10:38:07+5:30

कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेल्या मास्कची तसेच नागरिकांनीही वापरलेल्या मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

Scientifically dispose of masks; Directions of Nagpur Municipal Commissioner | मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

Next
ठळक मुद्देनागरिकांनी वापरलेले मास्क रस्त्यावर टाकू नयेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेल्या मास्कची तसेच नागरिकांनीही वापरलेल्या मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

वापरलेल्या मास्कमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका विचारात घेता अशा मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची गरज आहे. कोरोना रु ग्णावर काम करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आलेले मास्क बायोवेस्टमध्ये टाकले जावे. सोबतच नागरिकांनीही वापरलेले मास्क कचºयात न टाकता ते योग्यप्रकारे कागदात गुंडाळून कचरापेटीतच टाकणे गरजेचे आहे.
आमदार निवास व वनामती येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्यांनी वापरलेले मास्क गोळा करण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वाहनाद्वारे संकलित केले जातात. तसेच घरातच क्वारंटाईन करण्यात आलेल्यांकडे मास्क संकलित करण्यासाठी बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी जातात. त्यांच्याकडेच वापरलेले मास्क द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी मास्क रस्त्यांवर टाकू नये

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करीत आहेत. त्यांनी वापरलेले मास्क सार्वजनिक ठिकाणी वा रस्त्यावर न टाकता व्यवस्थित कागदात गुंडाळून कचरा संकलन गाडीत टाकावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
 

 

Web Title: Scientifically dispose of masks; Directions of Nagpur Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.