नागपुरात नकली विदेशी सिगारेटची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:00 PM2019-03-04T23:00:56+5:302019-03-04T23:05:01+5:30

विदेशी ब्राण्डच्या प्रतिबंधित नकली सिगारेट शहरात सर्रासपणे विकल्या जात आहेत. विमानतळावर २६ लाख रुपयाची बोगस सिगारेट जप्त केल्यानंतरही हा धंदा सुरू आहे, हे विशेष.

The sale of fake foreign cigarettes in Nagpur | नागपुरात नकली विदेशी सिगारेटची सर्रास विक्री

नागपुरात नकली विदेशी सिगारेटची सर्रास विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देकोट्यवधीचा महसूल बुडतोयविमानतळावरील कारवाईचा परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशी ब्राण्डच्या प्रतिबंधित नकली सिगारेट शहरात सर्रासपणे विकल्या जात आहेत. विमानतळावर २६ लाख रुपयाची बोगस सिगारेट जप्त केल्यानंतरही हा धंदा सुरू आहे, हे विशेष.
शहरात अनेक वर्षांपासून विदेशी ब्राण्डच्या नकली सिगारेटची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. कस्टम आणि इतर शासकीय विभाग अनेक दिवसांपासून या टोळीविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहे. परंतु त्यांना यश मिळत नव्हते. वर्षभरापूर्वी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्राण्डची दोन लाख रुपये किमतीची नकली सिगारेट जप्त करण्यात आली होती. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सिगारेट जप्त केल्यानंतर ती परिसरातच सुरक्षित ठेवली होती. नंतर या जप्त केलेल्या सिगारेटमधून मोठ्या प्रमाणावर सिगारेट चोरी झाल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणात सोनेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर काही दिवसासाठी नकली सिगारेट विक्री करणारे शांत बसले होते. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच अलीकडे नकली सिगारेटची सर्रास विक्री होत आहे.
भारतीय सिगारेटच्या तुलनेत विदेशातून येणाऱ्या नकली सिगारेट अर्ध्या किमतीचा मिळतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचा नफा दुप्पट होतो. ते पानटपरी चालवणारे, हॉटेल आणि बार संचालकांशी संगनमत करून बोगस सिगारेटची विक्री करतात. व्यापारी आणि सिगारेट विकणारे नफा कमावण्यासाठी नकली सिगारेटलाच प्राधान्य देतात. दुसरीकडे विदेशी सिगारेटच्या विक्रीवर भारतात प्रतिबंध आहे. विदेशी सिगारेट टर्की, इंडोनेशिया आणि दुबईमधून समुद्रमार्गाने भारतात दाखल होतात. त्याला मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई येथील बंदरावर उतरवले जाते. तेथून ते देशभरातील शहरात पोहोचविले जाते.
विदेशी सिगारेटच्या विक्रीतून सरकारला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकार विदेशी सिगारेटच्या विक्रीबाबत अतिशय कडक आहे. अशा सिगारेटची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अशा लोकाविरुद्ध कस्टम, अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) आणि पोलीस कारवाई करू शकतात. परंतु आतापर्यंत केवळ पोलिसांनीच एखाददुसऱ्या प्रकरणात कारवाई केली आहे. इतर विभागांना कुठलेही मोठे यश मिळालेले नाही. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नकली सिगारेटची विक्री होत आहे. शहरातील काही व्यापारीही यात सहभागी आहेत. शासकीय विभाग आणि शहरातील व्यापारात त्यांची चलती असल्याचे सांगितले जाते.
कठोर कारवाई केली जाईल
विदेशी सिगारेटची विक्री भारतात प्रतिबंधित आहे. याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एफडीए आणि पोलीस सक्षम आहे. माहितीच्या अभावामुळे या व्यवसायात असलेली मंडळी पकडली जात नाही. माहिती मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कावाई केली जाईल. नागरिकांनीही यासंबंधात कुठलीही माहिती असल्यास त्यांनी विभागाला सूचना द्यावी.
शशिकांत केकरे
सहायक आयुक्त, एफडीए

 

Web Title: The sale of fake foreign cigarettes in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.