आरटीआय : कामचुकारपणासाठी बहाणा संक्रमणाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:12 PM2020-09-23T23:12:54+5:302020-09-23T23:15:53+5:30

कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे.

RTI: Excuses for avoiding work transition! | आरटीआय : कामचुकारपणासाठी बहाणा संक्रमणाचा!

आरटीआय : कामचुकारपणासाठी बहाणा संक्रमणाचा!

googlenewsNext
ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्यास टाळाटाळमनपा अधिकारी म्हणताहेत, पोस्टाने अर्ज पाठवा!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. त्यासाठी वरिष्ठांचा आदेश असल्याचा बहाणा केला जात असून, पोस्टाने अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, स्वहस्ते अर्ज स्वीकारताना संक्रमणाची भीती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टमनच्या हातूनच लेटर स्वीकारायचे आहे. तेव्हा तेथून संक्रमण होणार नाही का, असा सवाल आहे.
शहरातील आरटीआय कार्यकर्ता सचिन खोब्रागडे गेल्या १५ दिवसापासून एक अर्ज घेऊन मनपाचे चक्कर कापत आहेत. परंतु, संक्रमणाचा काळ बघता सामान्य प्रशासन विभागाने अर्ज स्वीकारणे बंद केल्याचे सांगत, त्यांना परत पाठविले जात आहे. या बाबतीत खोब्रागडे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन यांच्याकडे तक्रार केली आहे.

आशा वर्कर्ससंदर्भात हवी आहे माहिती
खोब्रागडे यांना आशा वर्कर्ससंदर्भात माहिती हवी होती. कोरोना संक्रमणाच्या काळात उच्च न्यायालयाने आशा वर्कर्सना दैनिक २०० रुपये मानधन देण्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भातच आरटीआयद्वारे त्यांना माहिती हवी आहे. संक्रमणाच्या काळात किती आशा वर्कर्सना या योजनेचा लाभ झाला? केंद्र सरकारने कोरोना संदर्भात केलेल्या विमा योजनेत किती आशा वर्कर्सना सहभागी केले, याची माहिती त्यांना हवी होती.
मनपामध्ये आतापर्यंत ४०० लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळेच, येथे येणाºयांना केवळ महत्त्वाचे काम घेऊनच या असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीआयचे अर्ज आमच्या ग्रीवन्स अ‍ॅपवरही पाठविता येऊ शकतात. पोस्ट आणि ईमेलद्वारेही हे अर्ज आम्ही स्वीकारत आहोत. टाळण्याच्या मागचा उद्देश सुरक्षेचा आहे आणि यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
निर्भय जैन, उपायुक्त, मनपा

Web Title: RTI: Excuses for avoiding work transition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.