आरटीईच्या शाळा वाढल्या, पण जागा घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 12:43 AM2021-02-20T00:43:28+5:302021-02-20T00:49:54+5:30

RTE schools increased आरटीईसाठी आतापर्यंत ६८१ शाळांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीपेक्षा शाळेच्या नोंदणीची संख्या वाढली आहे. शाळांची नोंदणी वाढली असली तरी, आरक्षित जागा घटल्या आहे.

RTE schools increased, but space decreased | आरटीईच्या शाळा वाढल्या, पण जागा घटल्या

आरटीईच्या शाळा वाढल्या, पण जागा घटल्या

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ६८१ शाळांची नोंदणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आरटीईसाठी आतापर्यंत ६८१ शाळांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीपेक्षा शाळेच्या नोंदणीची संख्या वाढली आहे. शाळांची नोंदणी वाढली असली तरी, आरक्षित जागा घटल्या आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यात आरटीईच्या प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरू आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात ६८१ शाळांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षी एकुण ६८० शाळांनी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी ६८० शाळेत ६ हजार ६८५ जागा आरटीईसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. परंतु यंदा ६८१ शाळेतून केवळ ५६०० जागा आरक्षित केल्या आहेत. आरटीईच्या वेळापत्रकानुसार ८ फेब्रुवारीला शाळांच्या नोंदणीची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, त्याला दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा मुदतवाढ दिली असून आतापर्यंत ६८१ शाळांनी नोंदणी केली आहे. नोंदणीच्या प्रक्रियेत पुन्हा शाळा वाढतील, अशी अपेक्षा शिक्षण विभागाला आहे.

Web Title: RTE schools increased, but space decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.