आररएसएसचा राष्ट्रवाद हिटलर-मुसोलिनीशी प्रेरित : भूपेश बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 09:17 PM2019-10-14T21:17:07+5:302019-10-14T21:18:34+5:30

इतरांना राष्ट्रवाद शिकविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा राष्ट्रवाद हा हुकूमशाहीचे प्रतीक असलेल्या हिटलर व मुसोलिनीशी प्रेरित असल्याची टीका काँग्रेस नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

RSS's nationalism inspired by Hitler-Mussolini: Bhupesh Baghel | आररएसएसचा राष्ट्रवाद हिटलर-मुसोलिनीशी प्रेरित : भूपेश बघेल

आररएसएसचा राष्ट्रवाद हिटलर-मुसोलिनीशी प्रेरित : भूपेश बघेल

Next
ठळक मुद्देगांधीजींना स्वीकारताना गोडसेला नाकारणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतरांना राष्ट्रवाद शिकविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा राष्ट्रवाद हा हुकूमशाहीचे प्रतीक असलेल्या हिटलर व मुसोलिनीशी प्रेरित असल्याची टीका काँग्रेस नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सोमवारी नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. बघेल म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढाईत आरएसएसची कुठलीही भूमिका नव्हती. ते इंग्रजांचे अनुयायी होते, तरीही इतक्या वर्षांत त्यांना कधी काँग्रेसने देशद्रोही ठरविले नाही. काँग्रेस महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालतो. महात्मा गांधीजींचा राष्ट्रवाद हा या देशातील पारंपरिक राष्ट्रवाद आहे. भगवान महावीर व गौतम बुद्ध यांच्या विचारांचे प्रतीक म्हणजे महात्मा गांधी होते. त्यांच्या १५० व्या जन्मशताब्दी महोत्सवी वर्षात भाजपचे नेते पदयात्रा काढत आहेत. भाजपवाले महात्मा गांधीजींचे विचार स्वीकारताहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. परंतु महात्मा गांधीजींचे विचार स्वीकारत असतानाच नाथुराम गोडसे यांचा विरोध करणार का? गोडसे मुर्दाबाद म्हणणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजप निवडणुकीमध्ये कधीच मुद्यांवर बोलत नाही. जीएसटी, नोटाबंदीमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. परंतु यावर साधा शब्दही निवडणुकीत काढला जात नाही. रिझर्व्ह बँकेकडून १ लाख ७४ हजार कोटी रुपये काढून घेतले, याचा उल्लेखही नसल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
महाराष्ट्राला केंद्रशासित केले तर चालेल का?
कमल ३७० बाबत बोलताना बघेल म्हणाले, कुठल्याही राज्याला विचारात न घेता केंद्रशासित राज्य बनविणे योग्य नाही. उद्या जर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली नाही, तर एक अध्यादेश काढून महाराष्ट्राला केंद्रशासित राज्य करण्यात आले तर तुम्हाला चालेल का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: RSS's nationalism inspired by Hitler-Mussolini: Bhupesh Baghel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.