वृद्धेला लुटले; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:02+5:302021-06-18T04:08:02+5:30

दुचाकी चालकाचा मृत्यू नागपूर : अमरावती मार्गावर एका दुचाकीचालकाचा वाहनासोबत झालेल्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी रात्री शिवाजी सिंह (५४, ...

Robbed the old man; Accused arrested | वृद्धेला लुटले; आरोपीला अटक

वृद्धेला लुटले; आरोपीला अटक

Next

दुचाकी चालकाचा मृत्यू

नागपूर : अमरावती मार्गावर एका दुचाकीचालकाचा वाहनासोबत झालेल्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी रात्री शिवाजी सिंह (५४, म्हाडा कॉलनी) हे दुचाकीने जात होते. दत्तवाडीजवळ एम.एच. ४० / वाय ३०९३ क्रमांकाच्या वाहनाची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाडी पोलिसांनी वाहनचालक आकाश डोमाजी टाले (२७, आठवा मैल) याच्यावर गुन्हा दाखल केला. :::::::::::::::::::::::::::::::::

शेजाऱ्यांकडून हल्ला; तिघे जखमी

नागपूर : वृद्ध आणि त्याच्या मुलांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ६१ वर्षीय विलास प्रांजले यांना शिव्या देण्याचा आवाज आल्याने ते बुधवारी रात्री घराबाहेर आले. त्यांना आणि त्यांच्या मुलाला पाहून सुरेंद्र कोठेकर शिवीगाळ करीत मारहाण करायला लागला. त्याचा साथीदार विक्की नंदनवार याने त्यांच्या मुलाला धारदार शस्त्राने जखमी केले. त्यांची मुलगी भांडण सोडविण्यास गेली असता अश्विन कोठेकर, त्याचे वडील सुरेश कोठेकर यांनी तिलाही मारहाण केली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Robbed the old man; Accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app