नागपुरातील रेस्टाॅरंट रात्री १२ पर्यंत सुरू राहणार; मनपा आयुक्तांचे आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 09:43 PM2021-10-20T21:43:38+5:302021-10-20T21:44:25+5:30

Nagpur News कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याने शहरातील रेस्टाॅरंट आणि भोजनालये रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Restaurant in Nagpur will be open till 12 midnight; Order of Municipal Commissioner issued | नागपुरातील रेस्टाॅरंट रात्री १२ पर्यंत सुरू राहणार; मनपा आयुक्तांचे आदेश जारी

नागपुरातील रेस्टाॅरंट रात्री १२ पर्यंत सुरू राहणार; मनपा आयुक्तांचे आदेश जारी

googlenewsNext


 

नागपूर : कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याने शहरातील रेस्टाॅरंट आणि भोजनालये रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी नवीन आदेश जारी केले आहेत. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, रेस्टाॅरंट, हॉटेल्स यासह विविध आस्थापनांच्या कामाच्या वेळेवरील निर्बंधामुळे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टाॅरंट आणि भोजनालये रात्री १२ पर्यंत तर अन्य आस्थापना रात्री ११ पर्यंत सुरू ठेवता येतील.

Web Title: Restaurant in Nagpur will be open till 12 midnight; Order of Municipal Commissioner issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल