हिंसक गुन्ह्यांमागची जाणून घेणार कारणे; विधी विद्यापीठ व  पोलिसांत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 10:23 AM2021-07-21T10:23:43+5:302021-07-21T10:24:14+5:30

Nagpur News हिंसक गुन्ह्यांमागची बारकाईने कारणमीमांसा केल्यानंतर असे गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, त्यासंबंधाने राष्ट्रीय विधी विद्यापीठाची मंडळी संशोधन करणार आहेत.

Reasons to learn behind violent crimes; Memorandum of Understanding between Law University and Police | हिंसक गुन्ह्यांमागची जाणून घेणार कारणे; विधी विद्यापीठ व  पोलिसांत सामंजस्य करार

हिंसक गुन्ह्यांमागची जाणून घेणार कारणे; विधी विद्यापीठ व  पोलिसांत सामंजस्य करार

Next
ठळक मुद्देविधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंद्रकुमार, ओएसडी (अकॅडमी) प्रा. रमेशकुमार, तर शहर पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे मार्गदर्शक सल्लागार म्हणून भूमिका वठवतील.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील हिंसक गुन्ह्यांमागची बारकाईने कारणमीमांसा केल्यानंतर असे गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, त्यासंबंधाने राष्ट्रीय विधी विद्यापीठाची मंडळी संशोधन करणार आहेत. शहर पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्यात मंगळवारी या संबंधीचा सामंजस्य करार झाला. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी स्वाक्षरी केली.

नागपुरात वारंवार घडणारे रक्तरंजित गुन्हे, हिंसक घटना सर्वत्र चर्चा अन् चिंतनाचा विषय ठरल्या आहे. त्यामुळे त्यामागची पार्श्वभूमी काय, गुन्हेगारांची मानसिकता आणि संबंधित कारणांचा बारीकसारीकपणे अभ्यास करतील. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती शहर पोलीस विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाला उपलब्ध करून देतील. त्यानंतर असे गुन्हे कसे रोखायचे, त्यासाठी काय उपाययोजना करायच्या यावर तंत्रशुद्ध विचारविमर्श केला जाईल. त्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची, उद्बोधनाची गरज आहे, तेसुद्धा ठरवले जाईल आणि नंतर उपाययोजना अमलात आणल्या जातील, असे आजच्या सामंजस्य करारात ठरवण्यात आले.

हे आहे संशोधकांचे पथक

तर, विधी विद्यापीठाचे सहा. प्रा. डॉ. रेंगास्वामी स्टॅलिन (सामाजिक शास्त्र, गुन्हेगारी आणि न्याय वैज्ञानिक शास्त्र), सहा. प्रा. डॉ. हिमांशू पांडे (पुरावा, कायदा), सहा. प्रा. त्रिशा मित्तल (गुन्हेगारी, कायदा) आणि पोलीस विभागाकडून उपायुक्त विनीता साहू, लोहित मतानी, गजानन शिवलिंग राजमाने यांचे संयुक्त पथक संशोधनाचे कार्य करणार आहे.

---

Web Title: Reasons to learn behind violent crimes; Memorandum of Understanding between Law University and Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस