शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा : महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:15 PM2019-08-29T23:15:55+5:302019-08-29T23:20:03+5:30

शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी केले.

Reach out to the public about government plans: Mayor's appeal | शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा : महापौरांचे आवाहन

शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा : महापौरांचे आवाहन

Next
ठळक मुद्देकार्यशाळेत नगरसेवकांना प्रभागामध्ये शिबिर आयोजित करण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतात. जनतेच्या समस्या प्रभावीपणे शासनापुढे मांडण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौरनंदा जिचकार यांनी गुरुवारी केले.
नागपूर महापालिका आरोग्य विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती नगसेवकांमार्फत जनतेपर्यत पोहचवण्यात यावी, या उद्देशाने महापौर यांच्या अध्यक्षतेत महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, वैद्यकीय सेवा व आरोग्य व वैद्यकीय सेवा समिती उपसभापती नागेश सहारे, समिती सदस्य लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते.
शासनाच्या योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नाही. राज्य शासनाने आरोग्यविषयक योजनांचे एक कवच नागरिकांना दिले आहे. त्याची अंमलबजावणी नीट होणे गरजेचे आहे. या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी हे उत्तम माध्यम आहे. याचा विचार करता नगरसेवकांना या योजनांविषयी माहिती असणे आवश्यक असल्याचे महापौर म्हणाल्या.
शहरीकरण व त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाची अंमलबजावणी आरोग्य विभागामार्फत के ली जाते. परंतु या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे मत नंदा जिचकार यांनी व्यक्त केले.
भावना सोनकुसळे यांनी शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य पोषण आहार दिन, महिला आरोग्य समिती, कुटुंब कल्याण या सर्व योजनांसह शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात व मनपा दवाखान्यात उपलब्ध सेवांबाबत माहिती दिली. मनपाचा हा पहिलाच उपक्रम असून, नगरसेवकांसाठी योजनांची माहिती देणारी कार्यशाळा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली.

Web Title: Reach out to the public about government plans: Mayor's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.