Ratan Tata took a meeting with Sarasanghachalak | रतन टाटांनी घेतली सरसंघचालकांची भेट
रतन टाटांनी घेतली सरसंघचालकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट संघाकडून गुप्त ठेवण्यात आली होती. सकाळी १०.३० च्या सुमारास टाटा यांनी संघ मुख्यालयात डॉ.भागवत यांची भेट घेतली व त्यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. याअगोदर २८ डिसेंबर २०१६ रोजी टाटा यांनी अचानकपणे संघ मुख्यालयाला भेट दिली होती. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर ती भेट झाल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर २०१८ मध्येदेखील त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. दरम्यान, बुधवारी झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली व हा दौरा इतका गुप्त का ठेवण्यात आला यासंदर्भात ठोस माहिती मिळू शकली नाही.

 


Web Title: Ratan Tata took a meeting with Sarasanghachalak
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.