ट्रान्सपोर्टरला खंडणी मागितली : पिस्तुलाचा धाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 08:10 PM2020-08-13T20:10:21+5:302020-08-13T20:12:53+5:30

पिस्तुलाच्या धाकावर ट्रान्सपोर्टरला खंडणी मागणाऱ्या आरोपीवर लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Ransom demanded from transporter: fear of pistol | ट्रान्सपोर्टरला खंडणी मागितली : पिस्तुलाचा धाक

ट्रान्सपोर्टरला खंडणी मागितली : पिस्तुलाचा धाक

googlenewsNext
ठळक मुद्देलकडगंजमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर ट्रान्सपोर्टरला खंडणी मागणाऱ्या आरोपीवर लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सय्यद रधी सय्यद अली मोहसीन (वय ४५) असे या प्रकरणातील फिर्यादी ट्रान्सपोर्टरचे नाव आहे.
सय्यद यांनी बुधवारी लकडगंज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पाटणसावंगी येथील सद्भावना कॉलनीत राहणारा आरोपी सलीम अन्सारी आशिक अन्सारी हा ४ ऑगस्टला दुपारी २ वाजता सय्यद यांच्या वर्धमान नगरातील ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोर आला. त्याने आपल्या कारमधून आवाज देऊन रधी यांना बाहेर बोलावले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर पिस्तूल लावून अश्लील शिवीगाळ करत तूने मुझे बर्बाद कर दिया, असे म्हणून ६ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी प्रकरण कसेबसे निपटले. बुधवारी या प्रकरणाची तक्रार रधी यांनी लकडगंज ठाण्यात नोंदवली. या प्रकारामुळे आपण घाबरलो होतो. त्यामुळे तक्रार देण्यास वेळ झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी केली असता फिर्यादी आणि आरोपी दोघेही नातेवाईक असल्याचे उघड झाले. ते दोघेही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यातून त्यांचे आर्थिक व्यवहार बिघडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Ransom demanded from transporter: fear of pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.