नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 05:44 PM2019-10-18T17:44:28+5:302019-10-18T17:45:35+5:30

निवडणूक प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला उपराजधानीत पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. गोंदिया येथे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक सभेला पावसाच्या रागरंगामुळे रद्द करण्यात येऊन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषम मोबाईलवरून ऐकवण्यात आले.

Rainfall returns in some districts of Vidarbha including Nagpur | नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे पुनरागमन

नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे पुनरागमन

Next
ठळक मुद्देगडकरी यांचे भाषण मोबाईलवरून ऐकवलेधान कापणीचा हंगाम अडचणीततीन दिवस पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: निवडणूक प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला उपराजधानीत पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. गोंदिया येथे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक सभेला पावसाच्या रागरंगामुळे रद्द करण्यात येऊन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषम मोबाईलवरून ऐकवण्यात आले.
नागपुरात शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर हवेतील उकाड्यात कमालीची वाढ झाली होती. त्यानंतर अचानक पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या.
भंडारा जिल्ह्यात तुमसर शहर व परिसरात सकाळपासून एक तास जोरदार पाऊस झाला तर जिल्हाभर ढगाळ हवामान होते.
गोंदियात आयोजित भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या सभेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार होते. मात्र खराब वातावरणामुळे ही सभा रद्द करण्यात आली. यावेळेस गडकरी यांचे भाषण मोबाईलवरून उपस्थितांना ऐकवण्यात आले.
चंद्रपुरात सकाळपासून तुरळक पावसाने हजेरी लावली होती. वर्ध्यात मात्र पावसाने आपली अनुपस्थिती नोंदवली.
 

Web Title: Rainfall returns in some districts of Vidarbha including Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस