पहाटेपर्यंत सुरू असलेल्या नागपूरच्या झिरो डिग्री बारवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:18 PM2019-09-09T23:18:11+5:302019-09-09T23:19:56+5:30

शहरातील एमआयडीसी येथील बहुचर्चित झिरो डिग्री बारवर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांनी धाड टाकली. धाडीत पहाटे ४ वाजेपर्यंत बिनधास्तपणे बार चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

Raid on the Zero Degree Bar of Nagpur, which continues till dawn | पहाटेपर्यंत सुरू असलेल्या नागपूरच्या झिरो डिग्री बारवर धाड

पहाटेपर्यंत सुरू असलेल्या नागपूरच्या झिरो डिग्री बारवर धाड

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : नशेत आढळले ५८ ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील एमआयडीसी येथील बहुचर्चित झिरो डिग्री बारवर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांनी धाड टाकली. धाडीत पहाटे ४ वाजेपर्यंत बिनधास्तपणे बार चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. राजमाने यांच्या कारवाईमुळे शहरातील बार आणि पब संचालकात खळबळ उडाली आहे.
भेंडे ले-आऊट, स्वावलंबीनगर येथील रहिवासी तपन रमेशकुमार जायसवालचा एमआयडीसीत झिरो डिग्री बार आहे. हा बार नेहमीच चर्चेत राहिला आहे. एका गुन्हेगाराने येथे फायरिंग करून खळबळ उडवून दिली होती. बारमध्ये नेहमीच गुन्हेगारी आणि असामाजिक तत्त्वांचा वावर राहतो. पोलिसांच्या हाती लागलेले गुन्हेगार या बारचे नियमित ग्राहक असल्याची माहिती मिळाली होती. येथे पहाटेपर्यंत बिनधास्तपणे ग्राहकांना सेवा देण्यात येते. पोलिसांनी यापूर्वीही येथे दोनदा धाड टाकून कारवाई केली होती. त्यानंतरही बार संचालकाच्या वागणुकीत बदल झाला नाही. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांना रात्री गस्त घालताना पहाटे ४ वाजेपर्यंत बार सुरू राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्वरित बारवर धाड टाकली. पोलिसांचे वाहन पाहून बारच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सतर्क केले. ते मागील दाराने पळत होते. हे पाहून पोलिसांनी बारला घेराव घातला. परंतु काही ग्राहक पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांना बारमध्ये ५८ ग्राहक अढळले. यात युवक-युवतींची संख्या अधिक होती. चौकशीत अनेक युवक-युवती आपली ओळख लपवीत होते. काही ग्राहक अल्पवयीन असल्याची पोलिसांना शंका आली. परंतु कागदपत्र नसल्यामुळे माहिती घेऊन त्यांना सोडण्यात आले. बारमधील बहुतांश ग्राहक नशेत तर्र झाले होते. काही युवक-युवतींनी चांगलीच नशा केली होती. बारमध्ये कॅबिन तयार करण्यात आल्या होत्या. तेथे विशेष ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. ग्राहकांनी गोंधळ घातल्यास बारमध्ये बाऊन्सरसह ७५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. उशिरा बार सुरू ठेवण्याबाबत विचारणा केली असता तपन जायसवालच्या चेहºयावरील रंग उडाला. विशेष कॅबिनबाबत त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. बारमध्ये ग्राहक मादक पदार्थांचे सेवन करीत असल्याची पोलिसांना शंका आहे. बारमधील गुन्हेगारीवृत्तीच्या नियमित ग्राहकांकडून तशी माहिती मिळाली होती. धाड टाकल्यामुळे मादक पदार्थ गायब केल्याची शंका आहे. एमआयडीसी पोलिसांनी तपन जायसवालविरुद्ध मुंबई पोलीस कायदा तथा ठराविक कालावधीनंतर बार सुरू ठेवल्याबद्दल चालानची कारवाई केली आहे.
कारवाईमुळे पसरली दहशत
डीसीपी राजमाने यांच्या कारवाईमुळे उशिरापर्यंत बार सुरू ठेवणाºया बारच्या संचालकात दहशत निर्माण झाली आहे. गणेशोत्सवामुळे शहरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी बार आणि संवेदनशील स्थळांवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा जायसवालने पहाटेपर्यंत बार सुरू ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कुणाचे आहे अभय
झिरो डिग्री बारच्या संचालकाला कोणाचे अभय आहे, हा प्रश्न कारवाईनंतर उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वी बजाजनगर पोलिसांनी जायसवालविरुद्ध हप्ता वसुली आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. तपासात हे प्रकरण खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते. तपासात जायसवाल आणि तक्रारकर्ता यांच्यात क्रिकेट सट्टा वसुलीमुळे वाद झाल्याचे समजले होते. त्यानंतरही पोलिसांनी जायसवालच्या हालचालींवर लक्ष ठेवले नाही.
कठोर कारवाई करणार
याबाबत डीसीपी राजमाने यांनी बारमधील ग्राहकांची माहिती गोळा करीत असल्याचे सांगितले. काही ग्राहक गुन्हेगारीवृत्तीचे आणि अल्पवयीन असल्याची शंका आहे. त्यांची माहिती घेण्यात येत असून, जायसवालने तीनदा बार लायसन्सच्या अटींचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा विचार करण्यात येत आहे.

Web Title: Raid on the Zero Degree Bar of Nagpur, which continues till dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.