नागपुरातील लक्ष्मीनगरात दारूच्या नशेत कारचालकाचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 10:58 PM2019-05-11T22:58:42+5:302019-05-11T22:59:38+5:30

दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने रस्त्यावर हैदोस घातला. या कार चालकाने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अखेर दुभाजकाला धडकून कारही क्षतिग्रस्त झाली. ही घटना आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली.

Rages of drunk driver in Lakshminaragar at Nagpur | नागपुरातील लक्ष्मीनगरात दारूच्या नशेत कारचालकाचा हैदोस

नागपुरातील लक्ष्मीनगरात दारूच्या नशेत कारचालकाचा हैदोस

Next
ठळक मुद्देदुचाकी वाहनांना धडक, दोन गंभीर जखमी: दुभाजकाला धडकून कारचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने रस्त्यावर हैदोस घातला. या कार चालकाने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अखेर दुभाजकाला धडकून कारही क्षतिग्रस्त झाली. ही घटना आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शीनुसार रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास आठ रस्ता चौकाकडून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कार चालकाने लक्ष्मीनगर चौकात दोन दुचाकी वाहनांना मागून धडक दिली. रस्त्यावरील नागरिकांनी कारला रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु कार चालक भरधाव वेगाने कार घेऊन पळू लागला. यात कार चालकाने समोर जाऊन हॉटेल अशोक समोर आणखी दोन वाहनांना धडक दिली. यानंतर दुभाजकाला कार धडकली. यात कारचेही प्रचंड नुकसान झाले. कार चालकही जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, चालक नशेत असल्याचे आढळून आले. अपघाताची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमुळे जखमी झालेल्या इतर चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पोलिसांनी पुढे काय कारवाई केली, हे माहिती होऊ शकले नाही.

 

Web Title: Rages of drunk driver in Lakshminaragar at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.