देवलापार येथील कोविड केअर सेंटरचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:39+5:302021-05-10T04:09:39+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल असलेल्या देवलापार परिसरातील दुर्गम भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असताना तसेच ...

The question of Kovid Care Center at Deolapar was solved | देवलापार येथील कोविड केअर सेंटरचा प्रश्न मिटला

देवलापार येथील कोविड केअर सेंटरचा प्रश्न मिटला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल असलेल्या देवलापार परिसरातील दुर्गम भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असताना तसेच या भागात काेराेना रुग्णांवर उपचाराची साेय नसल्याने नवीन समस्या निर्माण झाली हाेती. मात्र, ही समस्या निकाली काढण्यात आली असून, देवलापार काेविड केअर सेंटर मंजूर करण्यात आले. या सेंटरमध्ये ३० ऑक्सिजन सिलिंडर व पाच आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.

या भागात काेराेना संक्रमण वाढत असताना उपचाराची साेय नसल्याने येथील रुग्णांना नागपूर, रामटेक, कामठी येथे पाठविले जायचे. मात्र, त्या शहरांमध्ये आधीच रुग्णांचा अधिक ताण व खाटांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसाेय व्हायची. शिवाय, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रुग्णांना खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणेही शक्य नव्हते. त्यामुळे देवलापार येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी पुढे आली. त्याअनुषंगाने लाेकमतमध्ये ‘देवलापारला हवे कोविड केअर सेंटर’ या शीर्षकाखाली वृत्तही प्रकाशित करण्यात आले.

या वृत्ताची दखल घेत काॅंग्रेसचे पदाधिकारी उदयसिंग यादव यांनी या मागणीचा शासनदरबारी पाठपुरावा केला. शिवाय, जिल्हा प्रशासनानेही या बातमीची दखल घेत देवलापार येथील कोविड केअर सेंटरला नुकतीच मंजुरी दिली आहे. या सेंटरमध्ये ३० ऑक्सिजन बेड व पाच आयसीयू बेडची व्यवस्था केली आहे. शिवाय, आवश्यक साधनसामग्रीसह औषधी, मनुष्यबळ, ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक असलेले सिलिंडर, मॅनिफोल्ड, कॉन्सन्ट्रेटर्स व ऑक्सिजन पाईपलाईन या सर्व बाबींची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.

...

देवलापारला कोविड केअर सेंटरची गरज होती. त्यासाठी सर्वप्रथम लोकमतने पाठपुरावा करायला सुरुवात केली. याची दखल घेत आम्ही ही मागणी शासनदरबारी रेटून धरली. आदिवासी भागातील काेराेना संक्रमण लक्षात घेता या सेंटरची गरज होती. ते मंजूर झाल्याने या भागातील समस्या सुटली आहे.

- उदयसिंग यादव, माजी उपसभापती

पंचायत समिती, रामटेक

...

देवलापार येथे उपचाराची साेय नसल्याने या भागातील काही गरीब नागरिकांना उपचाराअभावी काेराेनामुळे जीव गमवावे लागले. या काेविड केअर सेंटरमुळे या भागातील आदिवासी बांधवांसाेबत गरीब नागरिकांना माेठा फायदा हाेणार आहे. ही परिस्थिती पुढे येणार नाही.

- शाहिस्ता पठाण,

सरपंच, देवलापार.

Web Title: The question of Kovid Care Center at Deolapar was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.