On the Program Committee of the National Health Mission, Dr. Abhay Bang | राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर डॉ. अभय बंग
राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर डॉ. अभय बंग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक आणि ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांची राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. मिशनचे संचालक आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे अपर सचिव मनोज झालानी यांनी यासंदर्भातील पत्र डॉ.बंग यांना पाठविले आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे बहुतेक कार्यक्र म हे राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत कार्यान्वित होतात. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालन समितीवर डॉ.राणी बंग यांची तज्ज्ञ म्हणून यापूर्वीच नेमणूक झालेली आहे.
पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने काही महिन्यांपूर्वीच भारतातील आदिवासींच्या आरोग्याची स्थिती दाखविणारा अहवाल बनवून भारत सरकारला कृतीसाठी सादर केला आहे.

 


Web Title: On the Program Committee of the National Health Mission, Dr. Abhay Bang
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.