नागपूरच्या सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमधून पळाला कैदी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 08:38 PM2019-07-20T20:38:05+5:302019-07-20T20:39:56+5:30

सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला एक कैदी रुग्ण शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पळून गेल्याने खळबळ उडाली. श्वसन रोग विभागाच्या वॉर्ड ४३मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. तो क्षयरोगाचा जुना रुग्ण होता. त्याला उपचारासाठी हैदराबाद पोलिसांनी नागपुरात आणले होते.

Prisoner escaped from Nagpur's Super Specialty Hospital | नागपूरच्या सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमधून पळाला कैदी रुग्ण

नागपूरच्या सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमधून पळाला कैदी रुग्ण

Next
ठळक मुद्देहैदराबाद येथून नागपुरात आणले होते उपचाराला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला एक कैदी रुग्ण शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पळून गेल्याने खळबळ उडाली. श्वसन रोग विभागाच्या वॉर्ड ४३मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. तो क्षयरोगाचा जुना रुग्ण होता. त्याला उपचारासाठी हैदराबाद पोलिसांनी नागपुरात आणले होते.
चिजो चंद्रन नादार (३७) असे त्या कैदी रुग्णाचे नाव.
प्राप्त महितीनुसार, चिजोला ठशातून रक्त जात असल्याने हैदराबाद पोलिसांनी त्याला ४ जुलै रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्वसन रोग विभागात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तपासल्यावर हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरील विभागाच्या वॉर्ड ४३ मध्ये त्याला दाखल केले. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास परिचारिकेने त्याला औषधे दिली. सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान निवासी डॉक्टर ‘बीपी’ घेण्यासाठी आले असताना चिजो आपल्या खाटेवर नव्हता. सकाळची वेळ असल्याने शौचालयाला गेला असेल, असे समजून इतर रुग्णांचे डॉक्टरने बीपी घेतले. परंतु बराच वेळ होऊनही रुग्ण जागेवर आला नसल्याने शोधाशोध सुरू झाली. रुग्ण कुठेच दिसून न आल्याने अखेर अजनी पोलिसांना कैदी पळून गेल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज हस्तगत केल्याचे समजते.

 

 

Web Title: Prisoner escaped from Nagpur's Super Specialty Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.