नागपुरात विश्व योग दिनाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:47 PM2019-06-19T20:47:35+5:302019-06-19T20:48:30+5:30

नागपूर महापालिका व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे विश्व योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

Preparation for the World Yoga day in Nagpur in the last phase | नागपुरात विश्व योग दिनाची तयारी अंतिम टप्प्यात

नागपुरात विश्व योग दिनाची तयारी अंतिम टप्प्यात

Next
ठळक मुद्देमहापौरांनी घेतला तयारीचा आढावा: हजारो नागरिक सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिका व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे विश्व योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.
आढावा बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका रुपा रॉय, उज्ज्वला शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त महेश मोरोणे, प्रकाश वराडे, गणेश राठोड, विजय हुमने, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, सहायक अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, नेहरू युवा केंद्राचे उपनिदेशक शरद साळुंके, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक हितेंद्र वैद्य, गौरव दलाल, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सुनील सिरसीकर, योगाभ्यासी मंडळाचे अतुल मुजुमदार, गोपेश जारगर, पतंजली योग समितीचे प्रदीप काटेकर, छाजुराम शर्मा, विवेक बहुजन हिताय कल्याणकारी संस्थेचे देवराव सवाईथुल, आय.एन.ओ.च्या सचिव सुवर्णा मानेकर, अश्विन जव्हेरी, श्री. योग साधना केंद्रचे डॉ. प्रभाकर मस्के, के.जी. पोटे, सतीश भुरे, डॉ. गंगाधर कडू, युनिटी एस.ए.चे संजय निकुले, नागपूर जिल्हा योग असोसिएशनचे अनिल मोहगावकर, वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे, हर्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे श्रीकांत अण्णारपा, योगसूत्रा वे ऑफ लाईफ संस्थेच्या सुनिता वाधवान, निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीचे ज्ञानेश्वर गुरव, ओशोधारा संघ नागपूरचे संजय कटकमवार, महेंद्र नागपाल, सहजयोग ध्यान केंद्राचे महेश धांदेकर, सागर शिंदे, प्रदीप नवारे, आदित्य पैदलवार, प्रतीक आग्रे, अमित योगासन मंडळाचे संदेश खरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व विविध योग संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाला होणारी गर्दी विचारात घेता योग संस्थांचे प्रतिनिधी, योग साधकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश नंदा जिचकार यांनी यावेळी दिले. शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता विश्व योग दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. महापौर नंदा जिचकार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवितील.
श्वेत गणवेशात दिसणार योग साधक
योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांना मैदानात मुख्य द्वारातून प्रवेश करावा लागणार आहे. यानंतर स्टेडियमवर जाण्यासाठी प्रवेशद्वार क्रमांक २, ३, ४, ५, ६, ७, १०, ११ आणि १४ मधून प्रवेश करता येईल. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व योगसाधकांनी श्वेत गणवेश परिधान करून यावे, असे आवाहन नागपूर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Web Title: Preparation for the World Yoga day in Nagpur in the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.