गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 08:51 PM2020-01-02T20:51:27+5:302020-01-02T20:52:50+5:30

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन धोरणात्मक बाबीवर निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले.

Policy decision on Gosekhurd project sufferers soon: Assembly Speaker Nana Patole | गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन धोरणात्मक बाबीवर निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विदर्भ सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, अधीक्षक अभियंता अं. टालेकर प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी गोसेखुर्द प्रकल्पाची सद्यस्थिती कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी दिली. गोसेखुर्द प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करायचा असल्यास प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. या प्रकल्पासाठीचे भूसंपादन, निधी उपलब्धता, वनजमीन, रेल्वे क्रॉसिंग, रिक्त पदांमुळे कामावर होणारा परिणाम याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल.
गोसेखुर्द प्रकल्पातर्गत १०५८ कोटींची काही निवडक कामे नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कॉर्पोरेशनने भंडारा जिल्ह्यात केलेल्या कामाच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.
यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली. प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यात येणाऱ्या अडचणीबाबत तसेच पुनर्वसनातील १८ नागरी सुविधा देण्याबाबत धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर होणे आवश्यक आहे. त्यासाठी जानेवारीच्या दुसºया आठवड्यात मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.

गोसेखुर्द पुनर्वसित बांधवांना न्याय मिळावा
पुनर्वसन न झाल्यामुळे पुनर्वसित गावामध्ये पूर्णपणे नागरी सुविधा उपलब्ध करून न केल्याने हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तेथील नागरिकांना वीज बिल, पाणी बिल, घर टँक्स हे पूर्णपणे माफ करण्यात यावे तसेच पुनर्वसित गावात सुरु असलेली विकासकामे ही निकृष्ट दर्जाची होत असल्यामुळे या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांना यावेळी आमदार राजू पारवे यांनी बैठकीमध्ये केली. पुनर्वसनाच्या स्थळी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, व्यवस्थित रस्ते नाही, प्रकल्पग्रस्तांच्या हाताला काम नाही तसेच १८ नागरी सुविधा मिळाल्या नसल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. उमरेड मतदार संघाच्या भिवापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाच्या थूटानबोरी या गावाचा उल्लेख करीत १५० कुटुंब राहत असलेल्या गावातील नागरिक मागील तीन वषार्पासून वीजपुरवठा नसल्याने अंधारात जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Policy decision on Gosekhurd project sufferers soon: Assembly Speaker Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.