नागपुरात पोलीस हवालदाराला आरोपीकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 09:58 PM2020-11-07T21:58:17+5:302020-11-07T22:00:32+5:30

Police constable beaten by Accused, crime news वैद्यकीय तपासणीसाठी मेयोत आणलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या वाहनावर स्वतःचे डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले. त्याला आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदाराला मारहाण केली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. तर, त्याच्या पत्नीनेही पोलिसांना शिवीगाळ केली.

Police constable beaten by Accused in Nagpur | नागपुरात पोलीस हवालदाराला आरोपीकडून मारहाण

नागपुरात पोलीस हवालदाराला आरोपीकडून मारहाण

Next
ठळक मुद्देआरोपीच्या पत्नीकडून शिवीगाळ : मेयोतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वैद्यकीय तपासणीसाठी मेयोत आणलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या वाहनावर स्वतःचे डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले. त्याला आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदाराला मारहाण केली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. तर, त्याच्या पत्नीनेही पोलिसांना शिवीगाळ केली.

शाहबाज खान हबीब खान (वय ४५) आणि आयेशा खान शाहबाज खान (वय ४०) अशी आरोपींची नावे आहेत.

एका गुन्ह्याच्या संबंधाने तहसील पोलिसांनी शहाबाज खान याला ताब्यात घेतले होते. शुक्रवारी मध्यरात्री त्याला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात नेले. तेथून त्याला डॉक्टरकडे नेत असताना आरोपी शाहबाज खानने पोलिसांच्या वाहनावर स्वतःचे डोके आपटून जखमी करून घेतले आणि गोंधळ घालू लागला. त्याला पोलीस हवालदार रमेश आणि होमगार्ड अनिल यांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. तर त्याच्या सोबत असलेल्या आयेशा खान हिने सुद्धा पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी या दोघांनाही कसेबसे आवरले आणि त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: Police constable beaten by Accused in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.