प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनचे किट वितरण : 'बिब कलेक्शन एक्स्पो'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:48 PM2020-02-01T23:48:58+5:302020-02-01T23:55:15+5:30

आर सी प्लास्टो टँक अ‍ॅन्ड पाईप्स प्रायोजित तसेच नागपूर महामेट्रोद्वारा सहपुरस्कृत लोकमत नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात १० हजारावर धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर आणि राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत.

Plasto Nagpur Marathon Kit Distribution: Response to 'Bib Collection Expo' | प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनचे किट वितरण : 'बिब कलेक्शन एक्स्पो'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या टी-शर्टचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण करताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रूचिरा दर्डा, प्लास्टो टँक अ‍ॅन्ड पाईप्सचे संचालक विशाल अग्रवाल आणि वैभव अग्रवाल, महामेट्रोचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, एलेक्सिस हॉस्पिटलचे सिनियर प्रशासक डॉ. तुषार गावड, कोटक महिंद्रा बँकेचे रिजनल सेल्स मॅनेजर अभिजितसिंग राठोर, सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसाळे, ट्रिट आईस्क्रीमचे संचालक अमोल चकनलवार, विवांते अल्कलाईन वॉटरचे संचालक पृथ्वीराज जगताप आणि प्रोझोन पाम्सच्या मिस मीनल.

Next
ठळक मुद्देआरोग्य तपासणी, आहारावर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन; संगीताचीही मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर सी प्लास्टो टँक अ‍ॅन्ड पाईप्स प्रायोजित तसेच नागपूर महामेट्रोद्वारा सहपुरस्कृत लोकमत नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात १० हजारावर धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर आणि राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत.


सर्व धावपटूंसाठी बिब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी रामगोपाल माहेश्वरी सभागृह (हिंदी मोरभवन) झाशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या बिब वितरण कार्यक्रमात धावपटूंना किट देण्यात आली. याशिवाय आरोग्य तपासणी, व्यायाम, आहार, आदींविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले; सोबतीला रॉक बँड संगीत सादर करण्यात आले.

‘एक्स्पो’चे उद्घाटन महामॅरेथॉनचे ब्रीद असलेलेल्या ‘क्रॉस द लाईन’ रेषा क्रॉस करीत फित कापून आणि तसेच हवेत फुगे सोडून झाले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, महामॅरेथॉनचे रेस डायरेक्टर संजय पाटील, प्लास्टो टँक अ‍ॅन्ड पाईप्सचे संचालक विशाल अग्रवाल आणि वैभव अग्रवाल, महामेट्रोचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, एलेक्सिस हॉस्पिटलचे सिनियर प्रशासक डॉ. तुषार गावड, कोटक महिंद्रा बँकेचे रिजनल सेल्स मॅनेजर अभिजितसिंग राठोर, प्रोझोन पाम्सतर्फे मिस मीनल, सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसाळे, ट्रीट आईस्क्रीमचे संचालक अमोल चकनलवार, विवांते अल्कलाईन वॉटरचे संचालक पृथ्वीराज जगताप आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्व पाहुण्यांनी महामॅरेथॉनचे टी-शर्ट आणि गुडी बॅकचे लोकार्पण केले.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आयोजनाला शुभेच्छा देत महामॅरेथॉनचे आयोजन फिट इंडिया मुव्हमेंटला योगदान देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी पाणी वाचवण्याचा संदेश देण्याचे काम धावपटूंनी करावे. शिवाय देशात वर्षभरात अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दोन लाख इतकी असल्याने वाहतुकीचे नियम पाळण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

Web Title: Plasto Nagpur Marathon Kit Distribution: Response to 'Bib Collection Expo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.