शहरं
Join us  
Trending Stories
1
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
"सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या..."; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले
4
फुके, टिळेकरांनी पासेस नसताना अभ्यागतांना आणलेच कसे? विधानपरिषद सभापतींसमोर सभागृहात दोघांनाही समज
5
Dhule: कांदा भरताना विपरीत घडलं, ट्रक्टरसह ३ चिमुकल्या विहिरीत बुडाल्या, आई-वडिलांचा टाहो!
6
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम
7
अरेरे! १५ मिनिटं लवकर ऑफिसमध्ये पोहचल्यामुळे तरुणीने गमावली नोकरी, नेमकं काय घडलं?
8
Phaltan Doctor Death: "...म्हणून त्या दोघांची नावे लिहून तिने मृत्युला मिठी मारली"; CM फडणवीसांनी विधानसभेत सगळं प्रकरण सांगितलं
9
IND vs SA 1st T20I Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० चा थरार! सामना कुठे आणि कसा पाहाल?
10
"वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक
11
Viral Video : डोक्यावर सिलेंडर अन् खांद्यावर बॅग... 'ती'चे कष्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
12
'मॅडम, तुमच्या भावाला गांजाच्या तस्करीत पकडलंय?' पत्रकारांच्या प्रश्नाने भाजपाच्या महिला मंत्री संतापल्या
13
"मला माझा वाटा हवा", नवऱ्याला जमिनीचे ४६ लाख मिळताच परतली बॉयफ्रेंडसोबत पळालेली बायको
14
IndiGo नं केले ८२७ कोटी रिफंड, पाहा कसं चेक करायचं Refund Status?
15
पती मेहुणीच्या प्रेमात पडला; आधी पत्नीचा मोठ्या रकमेचा विमा काढला अन्... ऐकून होईल संताप!
16
Winter Special: गाजर कोफ्ता खाल्लाय? या हिवाळ्यात ट्राय करा दाटसर ग्रेव्ही असलेली रुचकर कोफ्ता करी 
17
तुमची फ्लाईट लेट किंवा कॅन्सल झाली? मग तुम्हाला 'इतका' मोबदला मिळणे बंधनकारक! काय आहेत नवीन नियम?
18
"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया
19
भारतीय रुपयाची होणारी घसरण चांगली बातमी आहे का? पाहा कोणाला होणार फायदा
Daily Top 2Weekly Top 5

Phaltan Doctor Death: "...म्हणून त्या दोघांची नावे लिहून तिने मृत्युला मिठी मारली"; CM फडणवीसांनी विधानसभेत सगळं प्रकरण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:34 IST

Devendra Fadnavis Phaltan Doctor Death case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाचे पडसाद उमटले. 

CM Fadnavis Phaltan Doctor Death: फलटण येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारण्यात आले. आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणात अटकेत असलेल्या पीएसआय बदनेने तरुणीचे शोषण केल्याचेही त्याच्या चॅट्समधून स्पष्ट झाले असल्याचे फडणवीसांनी विधानसभेत सांगितले. 

भाजपचे आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्युप्रकरणी प्रश्न विचारला. 'गुन्हेगारी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात फेरफार करण्याचा दबाव त्या डॉक्टरवर अटकेतील आरोपींपैकी एकाने टाकला असल्यामुळे, तिने आत्महत्या केली का? या प्रकरणातील एसआयटीचा तपास किती दिवसांमध्ये पूर्ण होणार?, असे प्रश्न साटम यांनी विचारले. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आणि इतर आमदारांनीही प्रश्न विचारले.

हातावरील अक्षर डॉक्टर तरुणीचेच

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. त्यातून समाजात दुःखाची लाट तयार झाली. याचा तपास करण्यासाठी एसआयटी समिती नेमली आहे. त्याचबरोबर न्यायालयीन चौकशीसाठी आयोगही नेमण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) जो अहवाल आला आहे, त्यात डॉक्टर महिलेने हातावर जे लिहिलेलं आहे, ते तिचेच हस्ताक्षर आहे."

बदने डॉक्टरचे शोषण केले

"दुसरा मुद्दा म्हणजे आरोपींनी दबाव आणला का? तर या सगळ्या प्रकरणात पोलीस अधिकारी बदने आहे. या बदनेची जी माहिती आपल्याकडे आलेली आहे. जे चॅट्स आलेले आहेत. त्यात तिची फसवणूक करून बदनेने तिचे शारीरिक शोषण केले असल्याचे लक्षात येत आहे. त्यातून लग्नाचे आमिष दाखवणे वगैरे गोष्टी लक्षात येतात. नंतर बदनेने वेगळी भूमिका घेतलेली दिसते. त्याने तिचे शोषण केल्याचे लक्षात येते", असे फडणवीस म्हणाले.  

"ती वैद्यकीय अधिकारी होती. जेव्हा एखाद्या आरोपीला अटक होते, तेव्हा तो अटकेसाठी फीट आहे का, याबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे लागते. अशा प्रकारे काही रिपोर्ट त्या महिलेने अनफीट दिले. म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र त्यावेळी महिलेचे जे वरिष्ठ आहेत, त्यांना लिहिले की, अत्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यातील हे गुन्हेगार असून, त्यांना अनफीट असल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. मग त्यावर चौकशी झाली. तिनेही पत्र दिले. पण ही सगळी बाब पाच महिने आधीची आहे", अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली. 

दुसऱ्या आरोपीनेही तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला

"आता जी आत्महत्या दिसते, त्यात एकीकडे बदनेने केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे, त्या आरोपीनेही एक प्रकारे फसवणूक केलेली आहे. म्हणून त्या दोघांचे नाव लिहून तिने आत्महत्या केली", असे फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.  

"यामध्ये आतापर्यंतचे रिपोर्ट आलेले आहेत, त्यात दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली म्हणजे गळफास घेऊन मृत्यू झालेला आहे. दुसरे म्हणजे तिच्या हातावर जे लिहिलेले आहे, ते अक्षरे त्या महिलेचेच आहेत. आता याचे आरोपपत्र लवकरच दाखल होईल. अनेक गोष्टी समांतरपणे सांगितल्या गेल्या आहेत. त्याचीही न्यायालयीन चौकशी करतो आहोत आणि या प्रकरणाचा तपासही एका महिला आयपीएस अधिकारी करत आहेत", अशी माहिती फडणवीस यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Phaltan Doctor Death: Exploitation revealed, suicide note names culprits, says CM.

Web Summary : CM Fadnavis revealed the Phaltan doctor's suicide involved exploitation by a PSI. The suicide note named two individuals, highlighting their deceitful actions. A SIT investigation is underway.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनdoctorडॉक्टरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDeathमृत्यूSatara areaसातारा परिसर