नागपुरात पेट्रोल ५१ पैसे, डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:40 PM2020-09-15T22:40:45+5:302020-09-15T22:42:24+5:30

पेट्रोल नव्वदीकडे वाटचाल करीत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने देशांतर्गत दरवाढीला बे्रक लागला आहे. पेट्रोलमध्ये ५१ पैसे आणि डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घसरण होऊन पेट्रोल १५ सप्टेंबरला प्रति लिटर ८८.७७ रुपये आणि डिझेल ७९.६५ रुपयांवर स्थिरावले.

Petrol in Nagpur falls by 51 paise, diesel by Rs 1.06 | नागपुरात पेट्रोल ५१ पैसे, डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घट!

नागपुरात पेट्रोल ५१ पैसे, डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घट!

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पेट्रोल नव्वदीकडे वाटचाल करीत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने देशांतर्गत दरवाढीला बे्रक लागला आहे. पेट्रोलमध्ये ५१ पैसे आणि डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घसरण होऊन पेट्रोल १५ सप्टेंबरला प्रति लिटर ८८.७७ रुपये आणि डिझेल ७९.६५ रुपयांवर स्थिरावले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरानुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार होते. त्याचा परिणाम स्थानिक बाजारात दरदिवशी दिसून येतो. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलची दरवाढ झाली होती. जूनमध्ये ७६.७७ रुपये असलेले पेट्रोलचे दर ७ सप्टेंबरपर्यंत ८९.२८ रुपये या सर्वाधिक उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर १० सप्टेंबर ९ पैशांची कपात होऊन ८९.१९ रुपयांपर्यंत खाली आले. १४ सप्टेंबरला ८८.९३ रुपये आणि १५ सप्टेंबरला ८८.७७ रुपयांपर्यंत खाली आले. तसेच सप्टेंबर महिन्यात डिझेल १.०६ रुपयांनी उतरले. १ सप्टेंबरला डिझेल प्रति लिटर ८०.७१ रुपये होते. ५ सप्टेंबरला ८०.४१ रुपये, ७ रोजी ८०.२९ रुपये, १० रोजी ८०.१७ रुपये, १४ रोजी ७९.८९ रुपये आणि १५ सप्टेंबरला प्रति लिटर ७९.६५ रुपयांवर स्थिरावले.

Web Title: Petrol in Nagpur falls by 51 paise, diesel by Rs 1.06

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.