नागपूर जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:53+5:302021-06-11T04:07:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ११ जून ते १४ जून या कालावधीत ...

Orange alert for Nagpur district | नागपूर जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्ट

नागपूर जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ११ जून ते १४ जून या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व एक किंवा दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच १४ जून रोजी एक किंवा दोन ठिकाणी वीज व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्याजवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी. साधारणत: दुपारी २ ते ६ या वेळेत वीज पडण्याचा धोका असल्या कारणाने पाऊस व वादळी वारा सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक शेताची कामे करावी व शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी. नदी किंवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

बॉक्स

मदतीसाठी संपर्क

जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण केंद्राचे कार्यालय आहे. पूर व इतर नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना कुठल्याही मदतीची गरज पडल्यास नागरिकांनी ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्र. १०७७ यावर संपर्क साधावा.

Web Title: Orange alert for Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.