देशातील एकमेव लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत वैज्ञानिक फक्त १५ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:26 PM2020-10-08T22:26:01+5:302020-10-08T22:28:08+5:30

Vijay Darda,Citrus Research Institute, Nagpur News देशात एकमेव असलेल्या नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रातून देशभरासाठी संशोधन होते. येथील वैज्ञनिक देशभरात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. मात्र या संशोधन संस्थेत वैज्ञानिक फक्त १५ तर तंत्रज्ञ १८ आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर देशाच्या लिंबूवर्गीय फळ उत्पादनात भर घालणाऱ्या या संशोधन केंद्राला पदपूर्तीची प्रतीक्षा आहे.

Only 15 scientists in the only citrus research institute in the country! | देशातील एकमेव लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत वैज्ञानिक फक्त १५ !

देशातील एकमेव लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत वैज्ञानिक फक्त १५ !

Next
ठळक मुद्देसंशोधकांच्या १० नव्या पदांचा प्रस्ताव : विजय दर्डा यांनी केले संस्थेच्या कार्याचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात एकमेव असलेल्या नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रातून देशभरासाठी संशोधन होते. येथील वैज्ञनिक देशभरात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. मात्र या संशोधन संस्थेत वैज्ञानिक फक्त १५ तर तंत्रज्ञ १८ आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर देशाच्या लिंबूवर्गीय फळ उत्पादनात भर घालणाऱ्या या संशोधन केंद्राला पदपूर्तीची प्रतीक्षा आहे.
लोकमत अ‍ॅडोटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी गुरुवारी या संशोधन केंद्राला भेट घेऊन कार्याची माहिती जाणून असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. २५० एकर क्षेत्रात पसरलेल्या या संस्थेत होणारे संशोधन, उत्पादकता वाढीचे प्रयोग, नव्या प्रजातींचा शोध, रोगमुक्त आणि किडीमुक्त अशा प्रतिकारक प्रजातींच्या कलमांच्या निर्मितीसाठी चालणारे संशोधन, पॅकेजिंग आणि स्टोअरेज प्रक्रिया आदी माहिती त्यांनी या भेटीत संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांच्याकडून जाणून घेतली. संस्थेचे प्रिन्सिलप रिसर्च सायन्टिस्ट डॉ. आर. के. सोनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
संस्थेच्या कार्याची माहिती देताना डॉ. लदानिया म्हणाले, सिट्रस ग्रिनिंग या आजाराचा संत्रा पिकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरच सध्या धोका आहे. या रोगात सिट्रससिला ही कीड जीवाणू पसरविते. त्यावर नियंत्रणाचे संशोधन संस्थेत झाले आहे. डिंक्या रोगाला प्रतिकारक असलेली अलिमाऊ प्रजातीही येथून संशोधित झाली आहे. रोगमुक्त मातृवृक्ष तयार करून त्यावर कलमे तयार करण्याचे काम येथे होते. या संशोधनातून देशाची उत्पादकता भविष्यात वाढलेली दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव्याने विकसित करण्यात आलेल्या जाफा व ब्लड रेड माल्टा तसेच ब्राझीलवरून आणलेल्या वेस्टीन आणि हॅमलिन या मोसंबीतील चार प्रजाती तसेच पर्ल टँजेलो आणि डेझी या संत्र्यामधील दोन अशा ६ प्रजातींच्या फळांची आणि बागेची पाहणीही यावेळी दर्डा यांनी केली. यावेळी झार्म इंचार्ज सुधीर शिरखेडकर, तांत्रिक सल्लागार बिपीन महल्ले आदी उपस्थित होते.

हे देशसेवेचे आणि देशभक्तीचे कार्य : विजय दर्डा
विजय दर्डा यांनी या भेटीप्रसंगी, हे देशसेवेचे आणि देशभक्तीचे कार्य आहे, अशा शब्दात येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या ध्यासाने येथील सर्वजण समर्पणाने काम करतात. देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि दर्जात्मकतेसाठी नवनवे प्रयोग करून ते देशाला समर्पित करणाºया येथील वैज्ञानिक आणि तंत्रज्ज्ञांच्या परिश्रमाचा देश सदैव ऋणी राहील. शासनाने येथील पदे पूर्णत: भरावी आणि कंत्राटावर पदभरती न करता नियमित सेवा दिली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भविष्यात संशोधनाच्या दृष्टीने पुढील पाच वर्षाकरिता वैज्ञानिकांची नवी १० पदे मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संस्थेमध्ये १५ वैज्ञानिक, १८ तंत्रज्ञ आणि अन्य विभागातील कंत्राटी कर्मचारी मिळून ५० जणांचे मनुष्यबळ या कामी आहे. वैज्ञानिकांची ४ पदे रिक्त आहेत. तंत्रज्ञांची २, अ‍ॅडमिनिष्ट्रेशन मधील ४ तर, सहायकांची २ पदे रिक्त आहेत.

Web Title: Only 15 scientists in the only citrus research institute in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.