गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 11:24 AM2022-01-20T11:24:01+5:302022-01-20T12:59:52+5:30

कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

one died as boat capsized in the backwater area of ​​Gosikhurd Dam | गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू

गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू

googlenewsNext

नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यात कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

गीता रामदास मृतम हिला गीता  निंबर्ते ( वय ३०) रा. कुजबा असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस ठाणे  वेलतूर अंतर्गत येणाऱ्या मौजा कुजबा  येथील ५ महिला कापूस वेचण्याकरिता आम नदीच्या पलीकडील शेतमालक परमानंद तिजारे (रा. टाकली) यांच्या शेतामध्ये त्यांच्याच डोंग्याने  जात हेत्या. दरम्यान, आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा फुटला व त्यात पाणी भरले. या प्रकाराने डोंग्यात बसलेल्या महिला घाबरल्या. तितक्यात काही कळायच्या आत डोंगा पलटी झाला. 

यात गीता निंबार्ते हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर, मनू सुरेश साळवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी 
लोमेश्वर गिरी, मंगला देवराव  भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे यांना स्थनिक नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, मांढळ येथे तातडीने उपचारासाठी दाखले केले. त्यापैकी लक्ष्मी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांना मेडिकल कॉलेज, नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

Web Title: one died as boat capsized in the backwater area of ​​Gosikhurd Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.