नागपुरात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 09:08 PM2021-05-13T21:08:40+5:302021-05-13T21:10:02+5:30

juvenile offenders, crime news उपराजधानीत घडणाऱ्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगार सहभागी असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या आहेत. आता यांचं कसं करावं, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.

The number of juvenile offenders is increasing in Nagpur | नागपुरात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढतेय

नागपुरात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढतेय

googlenewsNext
ठळक मुद्देहत्या, बलात्कारासह अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग : पोलिसांच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या

अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत घडणाऱ्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगार सहभागी असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या आहेत. आता यांचं कसं करावं, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष ऍक्‍शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यात अनेक मोठ्या गुंडावर हद्दपारी, एमपीडीए न

मकोका सारखी कडक कारवाई करण्यात आली आहे. हाती आलेल्या प्रत्येक मोठ्या गुन्हेगारांचा खुद्द पोलीस आयुक्तच क्लास घेतात. त्यामुळे शहरातील कुख्यात असणाऱ्यांपैकी अनेक गुन्हेगार चांगलेच दहशतीत आले आहे. मात्र नव्याने गुन्हेगारीत सक्रिय झालेले आणि १८ वर्षे पेक्षा कमी वय असलेले अनेक गुन्हेगार सोकावल्यासारखे झाले आहेत. शहरातील हत्या, बलात्कार, चोरी, घरफोड्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीत अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

गेल्या तीन आठवड्यात घडलेल्या इंदल बेलपारधी, रोशन कुंभारे तसेच अंकित बोकडे या तिघांच्या हत्याकांडात अल्पवयीन आरोपींचा सहभाग उघड झाला आहे. एवढेच नव्हे तर बलात्काराच्या प्रकरणात अल्पवयीन गुन्हेगारानची संख्या मोठी आहे. गेल्या आठवड्यात एका १६ वर्षाच्या आरोपीने उत्तर नागपुरातील १५ मुलीला गर्भवती बनविले. एमआयडीसीतील १६ वर्षाच्या मुलीसोबत १७ वर्षाच्या आरोपीने दोन वर्षापासून ५० पेक्षा जास्त वेळा शरीरसंबंध जोडले. विविध पोलिस ठाण्यात उघडकीस आलेल्या वाहन चोरीच्या घटनातही अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. सराईत गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस कठोर उपाय योजना करतात. मात्र अल्पवयीन असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांना कठोर कारवाई करता येत नाही. काही दिवसांसाठी त्यांना सुधारगृहात पाठविले जाते. तिकडून परत येताच ते सराईत बनतात आणि गुन्हेगारीत नव्या दमाने सक्रिय होतात. या एकूणच प्रकारामुळे पोलिसांसमोर नवीनच आव्हान उभे ठाकले आहे.

नशेच्या गोळ्यांचा वापर

मोठेच नव्हे तर अल्पवयीन गुन्हेगारही गुन्हा करण्यापूर्वी वापर करतात. प्रतिबंध असूनही अनेक मेडिकल स्टोर्सचे संचालक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय जास्त पैसे घेऊन या नशेच्या गोळ्या देतात. ज्या घेतल्यानंतर गुन्हेगार काय करतो, याचे त्याला भान उरत नाही.

Web Title: The number of juvenile offenders is increasing in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.