नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:18 PM2019-10-25T22:18:35+5:302019-10-25T22:27:10+5:30

उपराजधानीतील निवडणुकीबाबत यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीदेखील ३.८० टक्क्यांनी खालावली. परंतु ‘नोटा’ची संख्या मात्र वाढल्याचे दिसून आले.

NOTA became big in Nagpur | नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

Next
ठळक मुद्दे१५ हजारांहून अधिक मतदारांनी उमेदवारांना नाकारले राजकीय पक्षांना करावे लागणार आत्मचिंतन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील निवडणुकीबाबत यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीदेखील ३.८० टक्क्यांनी खालावली. परंतु ‘नोटा’ची संख्या मात्र वाढल्याचे दिसून आले. सहाही विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांना मतदारांनी अक्षरश: नाकारल्याचे चित्र दिसून आले. ‘नोटा’च्या संख्येत मागील वेळच्या तुलनेत वाढ झाली असून यामुळे राजकीय पक्षांसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. नागपुरात थोडेथोडके नव्हे तर १६ हजारांहून अधिक उमेदवारांनी ‘नोटा’चा वापर केला.
निवडणुकीतील उमेदवारांबाबत अनेकांना नेहमीच आक्षेप असतो. एकही उमेदवार चांगला नाही, अशी ओरड करून मतदान न करण्याचे समर्थन करीत असतात. निवडणूक आयोगाने यंदादेखील मतदारांसाठी ‘नोटा’चा पर्याय दिला. यामध्ये निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारापैकी एकाही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर अशा मतदारांना ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये सर्वात शेवटी ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. हजारो मतदारांनी याचा वापर केला. एकूण मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला व राजकीय पक्षांनी चांगले व सक्षम उमेदवार द्यावे असा एकाप्रकारे आग्रहच धरला.
२०१४ मध्ये शहरात ६ हजार १४८ जणांनी ‘नोटा’चे बटण दाबले होते.
शहरातून सर्वात जास्त पूर्व नागपुरातून ३,४६० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला. तर यंदा हाच आकडा १६ हजार ७२९ इतका राहिला. या वर्षी ‘नोटा’ वापरण्याचे प्रमाण दीडपटीने वाढले. ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संघटनेने आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. यानंतर ‘नोटा’ पर्याय वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सर्वाधिक ‘नोटा’ पश्चिम नागपुरात
शहरातील सहाही मतदारसंघातील सर्वाधिक ‘नोटा’चा उपयोग पश्चिम नागपुरात झाला. तेथे ३ हजार ७१७ मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले. तर पुर्व नागपुरात ३ हजार ४६० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात ३ हजार ६४ मतदारांनी ‘नोटा’चा उपयोग केला.

वर्षनिहाय ‘नोटा’ची संख्या
मतदारसंघ                          २०१९                २०१४
दक्षिण-पश्चिम नागपूर           ३०६४               १०१४
दक्षिण नागपूर                      २३५३              १२७६
पश्चिम नागपूर                       ३७१७             ११४३
मध्य नागपूर                         २१४९               ९३०
उत्तर नागपूर                        ११८६              ७३४
पूर्व नागपूर                           ३४६०             १०५१

Web Title: NOTA became big in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.