नागपुरात  पोलिसांच्या डोळ्यादेखत ट्रक चोरून नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 10:58 PM2020-10-19T22:58:03+5:302020-10-19T23:01:35+5:30

Truck theft case, police staion, Crime news शहरातील स्मार्ट पोलीस ठाण्याची ओळख असलेल्या लकडगंज ठाण्यातून कुख्यात आरोपीने लोखंडाने भरलेला ट्रक पोलिसांच्या डोळ्यादेखत चोरून नेला. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपी व ट्रकचा शोध घेण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहे.

In Nagpur, the truck was stolen before the eyes of the police | नागपुरात  पोलिसांच्या डोळ्यादेखत ट्रक चोरून नेला

नागपुरात  पोलिसांच्या डोळ्यादेखत ट्रक चोरून नेला

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : शहरातील स्मार्ट पोलीस ठाण्याची ओळख असलेल्या लकडगंज ठाण्यातून कुख्यात आरोपीने लोखंडाने भरलेला ट्रक पोलिसांच्या डोळ्यादेखत चोरून नेला. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपी व ट्रकचा शोध घेण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहे.

९ ऑक्टोबरच्या रात्री भंडारा रोडवरून २० टन लोखंड भरून असलेला सीजी/०४/जे/५०३७ क्रमांकाचा ट्रक चोरीला गेला होता. ट्रक तसेच लोखंडाची किंमत १४ लाख रुपये होती. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ ने या प्रकरणी मोर्शी येथील कुख्यात संजय ढोणे याला झिंगाबाई टाकळी येथून ट्रकसह अटक केली होती. पुढील तपासासाठी गुन्हे शाखेने ट्रक व आरोपींना लकडगंज पोलिसांकडे सोपविले होते. कुख्यात संजयची दोन-तीन दिवसानंतर जामिनावर सुटका झाली. सूत्रांच्या मते, जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा ट्रक चोरण्याच्या प्रयत्नात होता. ट्रकला ठाण्याच्या गेटसमोर पार्क केले होते. लकडगंज शहरातील पहिले पोलीस ठाणे आहे, येथे सीसीटीव्हीसह अत्याधुनिक सुविधासुद्धा आहे. संजय पुन्हा ट्रक चोरी करण्याच्या प्रयत्नात आहे, याची गुन्हे शाखेला कुणकूण होती. त्यांनी लकडगंज ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सतर्क केले होते. संजय सोमवारी पहाटे ४.३० वाजता लकडगंज ठाण्यात पोहचला आणि ट्रक घेऊन फरार झाला.

काहीवेळानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली. सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांचे पथक गठित करून तपासासाठी रवाना करण्यात आले. परंतु रात्री उशिरापर्यंत संजयचा काही पत्ता लागला नाही.

लकडगंज ठाण्यातूनच ट्रक चोरी 

संजयची सुटका झाल्यानंतर तो लोकांना पोलिसांच्या ताब्यातील ट्रक चोरून नेईल, असे सांगत होता. त्यानंतरही लकडगंज पोलीस झोपेत होते. शहर पोलिसांच्या इतिहासात ठाण्यातून पोलिसांच्या डोळ्यादेखत ट्रक चोरून नेल्याची ही पहिली घटना आहे. ट्रकमध्ये असलेले लोखंड हे उद्योजक सुमित पोद्दार यांचे असल्याचे सांगण्यात आले. पोद्दार हे पाच दिवसांपासून लोखंड ताब्यात घेण्यासाठी लकडगंज ठाण्यात येत आहेत. पोलिसांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

 पोलिसांची भीती राहिली नाही

क्रिकेट बुकीकडून वसुली करून सोडून देणे, महिला वकिलाला मारपीट करणे या प्रकरणात लकडगंज पोलिसांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात तर त्यांची भंबेरीच उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार एकीकडे गुन्हेगार व अवैध धंद्यावर लगाम लावत आहेत. या घटनेतून पोलिसांची भीती संपल्याचे दिसते आहे.

Web Title: In Nagpur, the truck was stolen before the eyes of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.