नागपूर रेल्वेस्थानक; १२ दिवसात ६,३४९ फुकट्या प्रवाशांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:01 PM2019-07-26T12:01:04+5:302019-07-26T12:01:33+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच सामानाची बुकिंग न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध अभियान सुरू केले आहे. अभियानांतर्गत १० ते २२ जुलै दरम्यान २६० रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. यात ६३४९ फुकट्या प्रवाशांची धरपकड करण्यात आली.

Nagpur Railway Station; Penalty for 6,349 travelers in 12 days | नागपूर रेल्वेस्थानक; १२ दिवसात ६,३४९ फुकट्या प्रवाशांना दंड

नागपूर रेल्वेस्थानक; १२ दिवसात ६,३४९ फुकट्या प्रवाशांना दंड

googlenewsNext
ठळक मुद्देदपूम रेल्वेची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच सामानाची बुकिंग न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध अभियान सुरू केले आहे. अभियानांतर्गत १० ते २२ जुलै दरम्यान २६० रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. यात ६३४९ फुकट्या प्रवाशांची धरपकड करण्यात आली.
रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी तिकीट खरेदी न करताच प्रवास करतात. काही प्रवासी जनरल कोचचे तिकीट घेऊन स्लीपर किंवा एसी कोचमध्ये बसतात. तर अनेकजण आपल्या सामानाची बुकिंगच करीत नाहीत. यामुळे रेल्वेच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा प्रवाशांवर अंकुश लावण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने १० ते २२ जुलैदरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागातील अधिकारी, तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान या कारवाईत सहभागी झाले. अभियानात २६० रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. यात फुकट्या ६३४९ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापोटी १६ लाख ५९ हजार ५२० रुपये दंड वसूल करण्यात आला.
कारवाईत विनातिकीट ८३७ प्रवाशांकडून ४ लाख १९ हजार ५५५ रुपये, अनियमित तिकीटधारक २०४१ प्रवाशांकडून ८ लाख ९३ हजार ४५ रुपये आणि सामानाची बुकिंग न करणाºया ३४७१ प्रवाशांकडून ३ लाख ४६ हजार ९२० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी योग्य दराचे तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

कचरा पसरविणाऱ्या ९८ जणांना दंड
रेल्वेगाडी, रेल्वेस्थानकाच्या परिसरात कचरा पसरविणे गुन्हा आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक प्रवासी कचरा पसरवितात. यामुळे रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानक परिसरात अस्वच्छता निर्माण होते. अभियानात अशा ९८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापोटी ९ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले.

Web Title: Nagpur Railway Station; Penalty for 6,349 travelers in 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.